वीरेंद्र सहवाग आणि सचिन तेंडुलकर (Photo Credit: Twitter/sachin_rt)

Road Safety World Series 2021: भारताचा माजी अनुभवी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) शुक्रवारी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज बांग्लादेश लेजेंड्स (Bangladesh Legends) संघाविरुद्ध उत्कृष्ट फलंदाजी करत केवळ 35 चेंडूत 80 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. सामन्यादरम्यान सेहवागने भारताचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरसह (Sachin Tendulkar) डावाची सुरुवात केली. बांग्लादेश संघाने दिलेले 110 धावांच्या प्रत्युत्तरात इंडिया लेजेंड्सने (Indian Legends) एकही विकेट न गमावता लक्ष गाठले. सामना संपल्यानंतर वीरेंद्र सेहवागने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट केले, 'परंपरा, प्रतिष्ठा, शिस्त.' त्याने पुढे लिहिले की, "चेंडू पाहताना मला आनंद झाला. दुसर्‍या टोकापासून सचिन पाजीनेही चेंडू फटकावला." शुक्रवारी शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर या रोड सेफ्टी सिरीजचे सामने खेळले जाणार आहेत. (Road Safety World Series 2021: पूर्ण फिक्स्चर, सामन्याची वेळ, लाईव्ह स्ट्रीमिंग आणि रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या संपूर्ण 6 संघांबद्दल जाणून घ्या)

मालिकेच्या पहिल्या सामन्यात बांग्लादेश लेजेंड्सविरुद्ध इंडिया लेजेंड सामन्याबद्दल बांग्लादेशने या पहिले फलंदाजी करत 19.4 ओव्हरमध्ये 109 धावा केल्या. संघासाठी फलंदाजी करणाऱ्या मोहम्मद नाझीमुद्दीनने 33 चेंडूत आठ चौकार व एका षटकारासह 49 धावांची सर्वाधिक खेळी केली. इंडिया लेजेंड्सकडून फिरकी गोलंदाज प्रज्ञान ओझाने शानदार गोलंदाजी केली आणि चार ओव्हरमध्ये 12 धावा देत 2 गडी बाद केले. युवराज सिंह आणि आर विनय कुमार यांनीही दोन गडी बाद केले. युसुफ पठाण आणि मनप्रीत गोनी यांना प्रत्येकी एक विकेट मिळाल्या. दुसरीकडे, इंडिया लेजेंड्सने फलंदाजी करताना एकही विकेट न गमावता 110 धावांचे लक्ष्य 10.1 ओव्हरमध्ये गाठले. सेहवागने संघासाठी नाबाद 80 धावा केल्या तर सचिन तेंडुलकरने 26 चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने नाबाद 33 धावा केल्या.

सेहवागने आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत खेळीला सुरुवात केली. सेहवागने बांगलादेशच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आणि अवघ्या 20 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. अर्धशतकी धावसंख्या गाठल्यावर सेहवागने आणखी आक्रमक फलंदाजी करत चौकार षटकारांची आतिषबाजी केली.