गुरु रमाकांत आचरेकर यांना शेवटचा निरोप देताना भावूक झालेला सचिन तेंडुलकर (Video)
Ramakant Achrekar Last Rites ( Phto Credits : Twitter)

Ramakant Achrekar Last Rites : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याला घडवणारे गुरु रमाकांत आचरेकर यांचे काल संध्याकाळी निधन झाले. आज त्यांच्यावर अंतिमसंस्कार केले जाणार असून त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली आहे. यावेळी सचिन तेंडुलकर उपस्थित राहिला असून त्याने आपल्या परमपुज्य गुरुंना खांदा दिला आहे. सचिनचे हे भावूक क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

सचिन तेंडुलकरसोबत विनोद कांबळी, अजित आगरकर, प्रविण आमरे यांना घडवण्यात आचरेकर सरांचा मोठा वाटा होता. रमाकांत आचरेकर (Ramakant Achrekar) यांना 'पद्मश्री' आणि द्रोणाचार्य या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. आचरेकर यांच्या निधनामुळे उत्तमोत्तम खेळाडूंची देणगी देणारा श्रेष्ठ प्रशिक्षक हरपला : मुख्यमंत्री

रमाकांत आचरेकरांच्या अत्यंसंस्काराला राज ठाकरेंसह अन्य मान्यवरांनी हजेरी लावली आहे.