South Africa National Cricket Team vs Pakistan National Cricket Team, 3rd ODI Match Live Toss Update: दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील (ODI Series) तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना आज 22 डिसेंबर रोजी खेळवला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना जोहान्सबर्गच्या (Johannesburg) वाँडरर्स स्टेडियमवर (The Wanderers Stadium) खेळला जात आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा 81 धावांनी पराभव केला. यासह पाकिस्तान संघाने मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. या मालिकेत टेंबा बावुमा दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करत आहे. तर पाकिस्तानची कमान मोहम्मद रिझवानच्या (Mohammad Rizwan) हातात आहे. दरम्यान, तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने (Temba Bavuma) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा - IND W vs WI W 1st ODI 2024 Live Score Update: स्मृती मंधानाच्या 91 धावांच्या जोरावर भारताचे वेस्ट इंडिजसमोर 315 रन्सचे आव्हान, पाहा संपूर्ण स्कोरकार्ड)
🚨 TOSS UPDATE 🚨
South Africa win the toss and opt to bowl first 🏏#SAvPAK | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/GDm1m8zZyr
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 22, 2024
पाहा दोन्ही संघ
दक्षिण आफ्रिका: टोनी डी झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, मार्को जेन्सेन, कॉर्बिन बॉश, ब्योर्न फोर्टुइन, कागिसो रबाडा, क्वेना म्फाका.
पाकिस्तानः सईम अयुब, अब्दुल्ला शफीक, बाबर आझम, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक/कर्णधार), कामरान गुलाम, सलमान आगा, तय्यब ताहिर, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, मोहम्मद हसनैन, सुफियान मुकीम.