SA vs AUS 2nd T20I 2020 Live Streaming: दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-20 लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Sony SIX वर
दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Photo Credit: Getty Images)

दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) पोर्ट एलिझाबेथच्या सेंट जॉर्ज पार्कमध्ये दुसऱ्या टी-20 सामन्यात आमने-सामने येतील. तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने मागील सामना जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजचा सामना निर्णायक होणार आहे. ऑस्ट्रेलियाने जर आजचा सामना जिंकला तर ते मालिका जिंकतील, दुसरीकडे जर यजमान आफ्रिका संघासाठी आजच्या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. मालिकेत आपले आव्हान जातं ठेवण्यासाठी यजमान संघ पूर्ण प्रयत्न करेल. 2018मधील टेस्ट मालिके दरम्यान झालेल्या प्रसिद्ध बॉल टेंपरिंग प्रकारणांनंतर ऑस्ट्रेलियाचा पहिला आफ्रिकी दौरा आहे. या दौऱ्यावर सर्वांचे लक्ष ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि उपकर्णधार स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) आणि डेव्हिड वॉर्नर (David Warner) यांच्यावर आहे. वॉर्नर पहिल्या सामन्यात अपयशी ठरला असला तरी स्मिथने कर्णधार आरोन फिंच सह मजबूत भागीदारी करत मोठी धावसंख्या उभारण्यात महत्वाची भूमिका बजावली. (SA vs AUS 1st T20I: ऑस्ट्रेलियाच्या एश्टन एगर ने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध घेतली हॅटट्रिक, ब्रेट ली नंतर 'ही' कमाल करणारा ठरला दुसरा गोलंदाज)

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामधील दुसरा टी-20 सामना पोर्ट एलिझाबेथच्या सेंट जॉर्ज पार्कमध्ये भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6:00 वाजता सुरु होईल. भारतीय चाहत्यांसाठी या सामन्याचे थेट प्रक्षेपण Sony Six आणि Sony Six HD वर उपलब्ध असेल. सामन्याचं ऑनलाईन स्ट्रीमिंग भारतात Sony Liv वर पाहायला मिळेल.

दक्षिण आफ्रिका संघाचा मागील काही टी-20 क्रिकेटमधील खेळ खालावला आहे. त्यांनी यापूर्वी इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर खेळत छोट्या स्वरूपातील मालिकाही गमावली होती. आणि आता त्यांना पराभवाला सामोरे जावे लागेल अशी शक्यता दिसत आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया संघ पूर्ण ताकदीने खेळत आहे. त्यांच्या फलंदाजीपासून गोलंदाजी पर्यंत सर्व विभागात त्यांनी मागील काही सामन्यापासून चांगला खेळ केला आहे.

असा आहे दक्षिण आफ्रिका-ऑस्ट्रेलिया संघ

दक्षिण आफ्रिका: क्विंटन डी कॉक (कॅप्टन, विकेटकीपर), टेंबा बावुमा, फाफ डु प्लेसिस, बोर्न फोर्टुइन, हेनरिक क्लासेन, डेविड मिलर, लुंगी एन्गिडी, एनरिच नॉर्टजे, एंडिल फेहलुकवाओ, ड्वाइन प्रीटोरियस, कागिसो रबाडा, तबरेज शम्सी, जॉन-जॉन स्मट्स, डेल स्टेन, पिटे वैन बिलजन, रासी वैन डर डूसन.

ऑस्ट्रेलिया: आरोन फिंच (कॅप्टन), सीन एबॉट, एश्टन एगर, एलेक्स केरी (उपकर्णधार), पॅट कमिन्स (उपकर्णधार), मिशेल मार्श, डार्सी शॉर्ट, झए रिचर्डसन, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, एडम ज़म्पा.