दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात तीन वनडे सामन्यांची मालिका 29 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. पहिला एकदिवसीय सामना पार्ल (Paarl) येथे खेळला जाणार आहे. दोन्ही देशांत नुकत्याच पार पडलेल्या टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाने यजमान आफ्रिकेला 2-1 असे पराभूत केले होते. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास सध्या उंचावला असेल. दुसरीकडे, यजमान दक्षिण आफ्रिका संघावर खूप दबाव असेल कारण घरगुती परिस्थितीत संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. ऑस्ट्रेलियाने शेवटची एकदिवसीय मालिका 1-2 ने गमावली, तर दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमधील खेळल्या गेलेली एकदिवसीय मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली होती. तथापि अतिथी संघ अधिक चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. (दक्षिण आफ्रिका टीमसाठी मोठा धक्का, ऑस्ट्रेलिया आणि भारतविरुद्ध वनडे मालिकेतून कगिसो रबाडा आऊट)
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामधील पहिला वनडे सामना पार्लमधील बोलँड पार्कमध्ये भारतीय वेळेनुसार दुपारी 4:30 वाजता सुरु होईल. भारतीय चाहत्यांसाठी या सामन्याचे थेट प्रक्षेपण Sony Six आणि Sony Six HD वर उपलब्ध असेल. सामन्याचं ऑनलाईन स्ट्रीमिंग भारतात Sony Liv वर पाहायला मिळेल.
या सामन्याआधी दक्षिण आफ्रिकी संघाला मोठा झटका बसला आहे. त्यांचा प्रमुख वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाला दुखापतीमुळे सामन्यापूर्वीच माघार घ्यावी लागली आहे. रबाडाच्या स्नायूमधील तणावामुळे माघार घ्यावी लागली आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया संघ पूर्ण जोशांत आहे. डेविड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथने टी-20 मालिकेत चांगली कामगिरी बजावली. शिवाय त्यांचे गोलंदाजही उत्तम कामगिरी करत आहेत.
असा आहे दक्षिण आफ्रिका-ऑस्ट्रेलिया वनडे संघ
दक्षिण आफ्रिका: क्विंटन डी कॉक (कॅप्टन), टेंबा बावुमा, डेव्हिड मिलर, आदिले फेहलुकवायो, तबरेज शम्सी, लुंगी एनगिडी, ब्युरन हेन्ड्रिक्स,हेनरिक क्लासेन, जनमन मालन, जे जे स्मट्स, एनरिच नॉर्टजे, लुथो सिपामला, केशव महाराज, काइल वेर्रेने.
ऑस्ट्रेलिया: आरोन फिंच (कॅप्टन), एश्टन एगर, अॅलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, जोश हेझलवुड, मार्नस लाबूशेन, मिच मार्श, केन रिचर्डसन, डार्सी शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, एडम जम्पा.