South Africa National Cricket Team vs Pakistan National Cricket Team 2nd Test 2025: दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना केपटाऊनमध्ये खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेकडून रायन रिक्लेटनने दमदार कामगिरी केली. त्याने पहिल्या डावात द्विशतक झळकावले आहे. रिक्लेटनच्या खेळीत 25 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. वृत्त लिहेपर्यंत तो 204 धावा करून खेळत होता. मुंबई इंडियन्सने एक पोस्टरही शेअर केले आहे. (हेही वाचा - PAK vs SA 2nd Test 2025 Day 1: रायन रिकेल्टन आणि टेंबा बावुमाच्या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या दिवशी केल्या 316 धावा)
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान रिक्लेटन सलामीसाठी आला. त्याच्यासोबत एडिन मार्करामही सलामीला आला होता. पण मार्कराम 17 धावा करून बाद झाला. रिक्लेटन टिकून राहिला. त्याने दमदार कामगिरी करत शतक झळकावले.
पाहा पोस्ट -
A maiden double century in Tests for Ryan Rickelton as the Proteas pile on the runs in Cape Town 💥#WTC25 | 📝 #SAvPAK: https://t.co/AUvsQcdxg8 pic.twitter.com/pa7lFdJNi4
— ICC (@ICC) January 4, 2025
रिक्लेटनने पाकिस्तानी गोलंदाजांना शिकवला धडा
रिक्लेटनने पाकिस्तानी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला कॅप्टन टेंबा बावुमाचीही त्याला चांगली साथ मिळाली. बावुमाने काल शतक झळकावून बाद झाला. त्याने 179 चेंडूंचा सामना करत 106 धावा केल्या. सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ 5 बाद 376 धावाकरून खेळत आहे.
मुंबई इंडियन्सने रिक्लेटनसाठी एक पोस्ट शेअर केली
वास्तविक, IPL 2025 च्या मेगा लिलावादरम्यान रिक्लेटनला मुंबई इंडियन्सने विकत घेतले होते. रिचल्टनला 1 कोटी रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी करण्यात आले. रिक्लेटनच्या शतकानंतर मुंबईने एक पोस्ट शेअर केली. टीमने X वर रिचल्टनचे पोस्टर शेअर केले आहे. रिक्लेटनने अद्याप आयपीएलमध्ये पदार्पण केलेले नाही. जरी त्याने 13 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यावेळी त्याने 263 धावा केल्या आहेत.