South Africa National Cricket Team vs Pakistan National Cricket Team 2nd Test 2025: दक्षिण आफ्रिका-पाकिस्तान (SA vs PAK) यांच्यातील दुसरी कसोटी 3 जानेवारीपासून म्हणजेच आज पासून खेळवली जात आहे. उभय संघांमधील हा सामना केपटाऊनमधील (Capetown) न्यूलँड्स येथे खेळवला जाणार आहे. दोन सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिका 1-0 ने आघाडीवर आहे. आता दुसरा सामना जिंकून मालिका काबीज करण्यावर दक्षिण आफ्रिकेच्या नजरा असतील. दुसरीकडे पाकिस्तान संघाला दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधायची आहे. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. (हेही वाचा - PAK vs SA 2nd Test 2025 Live Toss Updates: दुस-या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय; पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11)
प्रथम फलंदाजीला आलेल्या साउथ आफ्रिका संघाने सावध सुरुवात केली. त्यांना 61 धावांवर पहिला धक्का बसला ऐडन मार्क्रम हा 17 धावाकरुन बाद झाला. यानंतर फलंदाजीला आलेला विआन मुल्डरहा 5 धावाकरून बाद झाला तर ट्रिस्टन स्टब्स हा 0 धावांवर बाद झाला. अवघ्या 72 धावांवर 3 विकेट गेल्याने आफ्रिकेचा डाव संकटात होता. यानंतर
दोन्ही संघात बदल करण्यात आले आहेत. पाकिस्तानने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला असून, नसीम शाहच्या जागी मीर हमजाचा समावेश करण्यात आला आहे. टोनी डी झॉर्झी दुखापतीमुळे बाहेर असून त्याच्या जागी विआन मुल्डरचा समावेश करण्यात आला आहे.