राजस्थान येथील जयपूरमध्ये सवाई मानसिंग स्टेडियमवर (Sawai Mansingh Stadium, Jaipur)आज राजस्थान रॉयल्स Rajasthan Royals) विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal
Challengers Bangalore) हा सामना रंगणार आहे. दोन्ही संघ आयपीएलच्या 2019 च्या पर्वामध्ये तीन वेळेस मैदानात उतरले आहेत मात्र अद्याप त्यांना सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे विजयासाठी आसुसलेल्या दोन्ही संघांना आज पॉईंट टेबलवर त्यांचं खातं उघडण्याची संधी आहे. हा सामना स्टार स्पोर्ट्सवर इंग्रजी, हिंदी भाषेत कॉमेंट्रीसह पहायला मिळेल. तर स्टारस्पोर्ट्स (Star Sports) आणि हॉटस्टारवर (Hotstar Online)त्याच लाईव्ह स्ट्रिमिंग उपलब्ध असेल. IPL 2019 Full Schedule: 23 मार्च ते 5 मे दरम्यान रंगणार्या VIVO IPL 12 चे वेळापत्रक PDF स्वरूपात पहा आणि डाऊनलोड करा; जाणून घ्या कधी, कुठे रंगणार आयपीएलचे सामने
कुठे पहाल राजस्थान विरूद्ध बेंगलोर सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग
राजस्थान आणि बेंगलोर संघ आज जयपूरमध्ये एकमेकांसमोर उभे राहतील. राजस्थान रॉयल्स संघाने टॉस जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. रात्री आठ वाजल्यापासून हा सामना लाईव्ह पाहता येईल. .ऑनलाईन सामना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
.@rajasthanroyals Captain Ajinkya Rahane wins the toss and elects to bowl first against the @RCBTweets.#RRvRCB pic.twitter.com/APTvmZXu7o
— IndianPremierLeague (@IPL) April 2, 2019
कसा असेल संभावित संघ
राजस्थान रॉयल्स: अजिंक्य रहाणे (कर्णधार), कृष्णप्पा गौतम, संजू सैमसन, श्रेयस गोपाल, आर्यमान बिड़ला, एस. मिधुन, प्रशांत चोपड़ा, स्टुअर्ट बिन्नी, राहुल त्रिपाठी, बेन स्टोक्स, स्टीव स्मिथ, जोस बटलर, जोफ्रा आर्चर, ईश सोढ़ी, धवल कुलकर्णी, महिपाल लोमरोर, जयदेव उनादकट, वरुण एरॉन, ओशेन थॉमस, शशांक सिंह, लियाम लिविंगस्टोन, शुभम रंजाने, मनन वोहरा, एश्टन टर्नर, रियान पराग.
रॉयल चैलेंजर्स बेंगलोर: विराट कोहली (कर्णधार ), अब्राहम डिविलियर्स, पार्थिव पटेल (विकेटकीपर), मार्कस स्टोइनिस, शिमरोन हेटमेयर, शिवम दूबे, नाथन कुल्टर-नाइल, वाशिंगटन सुंदर, उमेश यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, हेनरिक क्लासेन , मोइन अली, कोलिन डी ग्रैंडहोम, पवन नेगी, टिम साउदी, अक्षदीप नाथ, मिलिंद कुमार, देवदत्त पडिक्कल, गुरकीरत सिंह, प्रार्थना रे बर्मन, कुलवंत केजरोलिया, नवदीप सैनी, हिम्मत सिंह.