Rajasthan Royals vs Chennai Super Kings | (Photo Credits- File Photo)

RR vs CSK, IPL 2019: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) अर्थातच आयपीएल (IPL 2019) स्पर्धेच्या 12 व्या पर्वातील 25 वा सामना गुरुवारी सवाई मान सिंह स्टेडीयमवर खेळला जात आहे. हा सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज (Rajasthan Royals vs Chennai Super Kings) यांच्यात खेळला जात आहे. सामना सुरु झाला असून, जयपूरच्या सवाई मानसिंह मैदानावर चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्याचा लाईव्ह स्ट्रीमिंगही (IPL 2019 Live Streaming) आपण पाहू शकता. त्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. दरम्यान, चेन्नई संघ 6 पैकी 5 सामने जिंकून गुणतक्त्यात अव्वल स्थानी आहे. तर, राजस्थान रॉयल्स केवळ 2 अंक मिळवून गुणतक्त्यात 7 व्या क्रमांकावर आहे.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज नाणेफेक

चेन्नई आणि राजस्थान आयपीएलमध्ये यंदा दुसऱ्यांदा एकमेकांसमोर येत आहेत. दोघांमध्ये या वर्षीचा पहिला सामना 31 मार्च रोजी एमए चिदंबरम स्टेडीयमवर झाला होता. यात चेन्नईने 8 धावांनी राजस्थानवर विजय मिळवला होता. त्यामुळे हा इतिहास पाहता मान सिंह स्टेडीयमवर खेळल्या जाणाऱ्या आजच्या सामन्याबद्दल उत्सुकता आहे. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज  हा सामना आपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहू शकता. तसेच, या सामन्याचे ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीमिंग आपण Hotstar पाहू शकता. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहण्यासाठी Hotstar येथे क्लिक करा.

चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संभाव्य संघ

चेन्नई सुपरकिंग्स : महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), केएम आसिफ, सॅम बिलिंग्स, चैतन्य बिश्नोई, ड्वेन ब्रावो, दीपक चाहर, फाफ डुप्लेसिस, ऋतुराज गायकवाड, हरभजन सिंह, इमरान ताहिर, रविंद्र जडेजा, केदार जाधव, नारायण जगदीशन, स्कॉट कुगलिन, मोनू कुमार, सुरेश रैना, अंबाती रायडू, मिशेल सैंटनर, कर्ण शर्मा, ध्रुव शोरे, मोहित शर्मा, शार्दुल ठाकुर, मुरली विजय, शेन वॉटसन, डेव्हिडड विली.

राजस्थान रॉयल्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), कृष्णप्पा गौतम, संजू सैमसन, श्रेयस गोपाल, आर्यमान बिड़ला, एस. मिधुन, प्रशांत चोपडा, स्टुअर्ट बिन्नी, राहुल त्रिपाठी, बेन स्टोक्स, स्टीव स्मिथ, जोस बटलर, जोफरा आर्चर, ईश सोढी, धवल कुलकर्णी, महिपाल लोमरोर, जयदेव उनादकट, वरुण एरॉन, ओशेन थॉमस, शशांक सिंह, लियाम लिविंगस्टोन, शुभम रंजाने, मनन वोहरा, अॅश्टन टर्नर, रियान पराग.