Gautam Gambhir (Photo Credit - Twitter)

एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला आहे. आता टीम इंडियाची योजना आता टी-20 विश्वचषक 2024 च्या (T20 World Cup 2023) भविष्याकडे आहे. त्याआधी बरेच टी-20 क्रिकेट खेळायचे आहे आणि आता कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि संघाचा सर्वात मोठा खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) यांच्या भवितव्याबद्दल अटकळ बांधली जात आहे. या संदर्भात अनेक माजी क्रिकेटपटूही आपल्या सूचना देत आहेत. याबाबत टीम इंडियाचा माजी फलंदाज गौतम गंभीरने आपलं मत व्यक्त केलं आहे. (हे देखील वाचा: ICC ची भ्रष्टाचाराविरोधात कडक कारवाई, अष्टपैलू खेळाडू Marlon Samuels वर घालण्यात आली 6 वर्षांची बंदी)

रोहितने कर्णधार राहावे

बुधवारी काही बातम्यांचा हवाला देत अशी माहिती मिळाली होती की, बीसीसीआयने कर्णधार रोहित शर्माला त्याच्या पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधील भविष्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याबाबत बोर्डाची लवकरच बैठक होणार असल्याचीही माहिती मिळाली आहे. रोहित टी-20 फॉरमॅटमधून निवृत्त होणार असल्याचीही चर्चा आहे. मात्र आता गंभीरने याबाबत वेगळेच वक्तव्य केले आहे. आगामी टी-20 विश्वचषकात रोहितने कर्णधारपद कायम राखावे आणि विराट कोहलीही संघाचा भाग असावा, असे त्याचे मत आहे.

गौतम गंभीरचे संपूर्ण विधान

एका मुलाखतीत गौतम गंभीरने स्पष्टपणे टी-20 विश्वचषकासाठी कर्णधार म्हणून हार्दिकचे नव्हे तर रोहितचे नाव सुचवले. तो म्हणाला, 'या दोघांची (रोहित आणि विराट) निवड झाली पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला रोहित शर्माला टी-20 विश्वचषकात कर्णधार म्हणून पाहायचे आहे. होय, हार्दिक पांड्या टी-20 इंटरनॅशनलमध्ये कर्णधार होता पण तरीही मला वाटते की विश्वचषकात रोहितने कर्णधार व्हावे. रोहितला फक्त एक फलंदाज म्हणून निवडू नका, तो एक महान लीडर आहे. त्याने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत कर्णधारपद आणि फलंदाजी या दोन्हीने स्वतःला सिद्ध केले आहे. जर तुम्ही रोहितची निवड करत असाल तर त्यालाच कर्णधार म्हणून निवडा. तर विराट कोहली हा तुमचा स्वयंचलित पर्याय असावा.

दुर्दैवाने अंतिम फेरीत भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव

टी-20 विश्वचषक 2024 जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. नुकत्याच संपलेल्या एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सलग 10 सामने जिंकले होते. संघ उपविजेताही राहिला. दुर्दैवाने अंतिम फेरीत भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. विराटनंतर रोहित हा स्पर्धेतील दुसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. आता रोहित पुन्हा त्याच्या हिटमॅन अवतारात दिसणार की नाही हा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी चाहत्यांना काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.