Rohit Sharma Ruled Out: भारतीय संघाला मोठा झटका; रोहित शर्मा एकदिवसीय आणि कसोटी मालिकेतून बाहेर
रोहित शर्मा (Photo Credit: Twitter/ICC)

न्यूझीलंडच्या दौर्‍यावर असलेल्या भारतीय संघाने (India Vs New Zealand) 5 सामन्यांच्या टी -20 मालिकेत भारताने 5-0 असा विजय मिळवत भारतीय प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. परंतु, शेवट्या सामन्यात भारताचा तडाखेबाज फलंदाज रोहित शर्माच्या (Rohit Sharma) खांद्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला एकदिवसीय आणि कसोटी मालिकेतून मुकावे लागले आहे. यामुळे रोहित शर्मा याच्या जागेवर कोणत्या खेळाडूला संधी मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  न्यूझीलंड ए संघाविरोधात  दुहेरी शतक झळकावणारा शुभमन गिल याला कसोटी सामन्यात संधी मिळण्याची अधिक शक्यता वर्तवली जात आहे.

भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यातील अखेरच्या टी -20 सामन्यात फलंदाजी करताना रोहित शर्मा गंभीर दुखापत झाली. रोहित शर्मा मैदानात असताना त्याला डाव्या पायाला वेदना जाणवत होत्या. त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले होते. त्यावेळी दोघाजणांनी त्याला पकडून त्याला ड्रेसिंग रुममध्ये नेले होते. एवढेच नव्हे तर रोहित शर्मा क्षेत्ररक्षण करण्यासाठी देखील मैदानात आला नव्हता. भारतीय संघाने मालिका जिंकल्यानंतर ट्रॉफीसह फोटो काढत असताना रोहित शर्माच्या डाव्या पायाला पट्टी दिसली होती. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यूझीलंड संघासोबत होणाऱ्या एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत रोहीत शर्माला विश्रांती देण्यात आली आहे, अशी माहिती समोर आली आहे. यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये निराशाजनक वातावरण निर्माण झाले आहे.  हे देखील वाचा- Video: संजू सॅमसन याची जबरदस्त फील्डिंग, 'सुपरमॅन' उडी मारत षटकार वाचवल्याबद्दल Netizens कडून कौतुक

तथापि, रोहित शर्माच्या जागी एकदिवसीय मालिका आणि कसोटी मालिकेमध्ये कोणाला संधी मिळणार? याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. न्यूझीलंड ए विरुद्ध भारत ए संघात खेळत शुभमन गिलने चांगले प्रदर्शन  दुहेरी शतक ठोकले होते. यामुळे न्यूझीलंड संघाविरोधात होणाऱ्या कसोटी सामन्यात शुभमन गिलला संधी मिळण्याची अधिक चर्चा आहे. न्यूझीलंड ए संघाविरोधात शुभमन गिलने पहिल्या इनिंग मध्ये 84 धावा केल्या होत्या. तर, दुसऱ्या इनिंगमध्ये नाबाद 204 धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. यात 22 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे.