रवींद्र जडेजा याने जसप्रीत बुमराह याच्या बॉलिंगचे केले अनुसरण, हिटमॅन रोहितला देखील झाले हसू अनावर, पहा Video
रवींद्र जडेजा (Photo Credit: @indiancricketteam/Instagram)

विश्वचषकमधील पराभवाला मागे सोडत भारतीय संघाने वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यादरम्यान पुन्हा एकदा विजयाचे सत्र सुरु केले आहेत. विंडीजविरुद्ध टी-20 मालिकेत टीम इंडियाने (Team India) निर्विवाद वर्चस्व गाजवले. आणि 3 सामन्यांच्या मालिकेत विंडीजचा व्हाईट वॉश केला. पहिल्या टी-20 सामन्यात टीमने विंडीजला रडत-खडत 4 विकेट्सने पराभव केला, तर दुसऱ्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे डकवर्थ लुईस नियमाने भारताने 22 धावांनी सामना जिंकला. आणि तिसऱ्या मॅचमध्ये संघाने आपले वर्चस्व बनवून ठेवत विजय मिळवला. दरम्यान, दोन्ही संघातील मॅच आधीच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) हेड्स अप चॅलेंज खेळताना दिसत आहे. (IND vs WI 1st ODI 2019: मैदानावर मस्तीच्या मूडमध्ये दिसला विराट कोहली, कॅरेबियन गाण्यावर असा केला डान्स, पहा Video)

बीसीसीआयने याचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात जडेजा संघाचा यॉर्कर स्पेशलिस्ट जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)याच्या गोलंदाजीची अनुकरण करताना दिसतोय. यात रोहित प्लेकार्ड न पाहता जडेजाला दाखवत आहे. जडेजा हावभाव करत सांगत आहे की कार्डवर काय लिहिले आहे आणि नंतर रोहित आपल्या अंदाजानुसार उत्तर देत आहे. या व्हिडिओमध्ये जडेजाने बुमराहच्या गोलंदाजीच्या शैलीची भन्नाट नक्कल केली आहे. जडेजाने बुमराहचे नाव ज्या पद्धतीने दर्शविले ते खूपच मजेदार होते. जडेजाची ही ऍक्टिंग पाहून हिटमॅनला देखील त्याचे हसू अनावर झाले. पहा हा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

WATCH @rohitsharma45 take the Heads Up Challenge with @royalnavghan 😅 This one's a laugh riot😂🤣

A post shared by Team India (@indiancricketteam) on

दरम्यान, या आधी जडेजाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याचे अनुसरण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात होता. विंडीज दौर्‍यापूर्वी विश्वचषकच्या सेमीफायनलमधील पराभवामुळे संघात दोन गट निर्माण झाल्याचे वृत्त समोर आले होते. असे देखील म्हण्यात आले होते की टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर रोहित शर्मा यांच्यात सर्व काही ठीक नाही. मात्र, स्वतः विराट आणि रोहित यांनी या वृत्तांना खंडन केले.