इंग्लंड (England) मधील आयसीसी (ICC) विश्वकप मध्ये भारताचा सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) ने तुफानी कामगिरी केली आहे. एजबस्टन (Edgbaston) येथे सुरु असलेल्या भारत (India) विरुद्ध बांग्लादेश (Bangladesh) मॅचमध्ये रोहितने विश्वकपमधील आपले चौथे शतक ठोकले आहेत. रोहितने चेंतूड शंभरी साजरी केली. दरम्यान, बांग्लादेशविरुद्ध शतकाने रोहितने ऑस्ट्रेलिया चा सलामीवीर डेविड वॉर्नर (David Warner) ला देखील मागे टाकले आहे. यंदाच्या विश्वकपमध्ये रोहित ने आतापर्यंत सर्वाधिक 500 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. दुरीकडे, वॉर्नरच्या 8 सामन्यात 516 धावा आहेत. (IND vs ENG मॅचमध्ये बोटातून रक्त निघत होते तरीही टीम इंडिया ला विजय मिळवून देण्याच्या प्रयत्नात होता एम एस धोनी, Netizens ने केली प्रशंसा View Photos)
या आधी, रोहित इंग्लंडच्या मैदानावर वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावणारा पहिला परदेशी फलंदाज बनला आहे. बांग्लादेशविरुद्ध शतक रोहितच्या वनडे करिअरमधील 26 वे शतक आहे. रोहित 92 चेंडूत 104 धावा करत झेल बाद झाला.
बांग्लादेशविरुद्ध टॉस जिंकत भारताने पहिले फलंदाजी चा निर्णय घेतला. सध्या, के एल राहुल च्या साथीने रोहित बांग्लादेशी गोलंदाजांची चांगलीच धुलाई करत आहे. राहुल आणि रोहितच्या जोडीने दुसऱ्यांदा विश्वकपमध्ये शतकी भागिदारी केली आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवल्यास टीम इंडिया 13 गुणांसह सेमीफायनलमध्ये पोहोचेल. भारताने आतापर्यंत 7 सामना खेळले आहेत. यातील पाच सामने भारताने जिंकले आहेत. तर, एक सामना पावसामुळे रद्द झाला आणि एका सामन्यात भारताला पराभवाचा धक्का बसला.