16 वर्षीय ग्रेटा थानबर्ग चं Climate Change वर भाषण ऐकत रोहित शर्मा ही बनला तिचा फॅन, 'हिटमॅन'ने समर्थनार्थ केले 'हे' Tweet
ग्रेटा थानबर्ग, रोहित शर्मा (Photo Credits: Getty Images)

रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) हवामान परिषदेत 16 वर्षीय ग्रेटा थॅनबर्ग (Greta Thunberg) ने उपस्थित केलेल्या मुद्द्यांचे जोरदार समर्थन केले आहे. टीम इंडियाच्या या सलामीवीराने या तरुण हवामान कार्यकर्त्याला प्रेरणादाई म्हटले आहे. ग्रेटाचे भाषण ऐकल्यानंतर रोहितने ट्विटरवर आपले विचार शेअर केले. स्विडनची रहिवासी असलेल्या ग्रेटा यांनी हवामान परिषदेत जगातील अनेक मोठ्या नेत्यांना चेतावणी दिली. हवामान बदलाविषयी, (Climate Change) ती म्हणाली होती, 'मला यावेळी शाळेत असले पाहिजे, परंतु परिस्थितीच्या तीव्रतेमुळे ती या व्यासपीठावर उभी राहिली आहे.' ग्रेटा यांनी परिषदेत जागतिक नेत्यांना इशारा दिला की जर जागतिक नेते हवामान बदलांचा सामना करण्यास अपयशी ठरले तर तरुण पिढी त्यांना कधीच माफ करणार नाही.

ग्रेटानी नेत्यांना चेतावणी दिली की, त्यांच्या पोकळ शब्दांत तुम्ही माझी स्वप्ने आणि माझे बालपण काढून घेतले. तिने यावेळी सांगितले की तिने शाळेत असले पाहिजे, परंतु परिस्थिती इतकी गंभीर आहे की ती या व्यासपीठावर उभी आहे.' ग्रेटाचे हे भाषण ऐकून रोहितदेखील तिचा फॅन बनला. आणि तिच्या समर्थनार्थ ट्विट करत तिला पाठिंबा दिला. ग्रेटाच्या भाषणाचा व्हिडिओ शेअर करताना रोहित म्हणाला की, "आमच्या मुलांवर पृथ्वी वाचविण्याची जबाबदारी सोडणे पूर्णपणे चुकीचे आहे. ग्रेटा आपण आमच्यासाठी प्रेरणास्रोत आहेत. आता कोणताही निमित्त करणार नाही. आपल्या येणाऱ्या पिढीसाठी सुरक्षित ग्रह बनवावे लागेल. आता परिवर्तनाची वेळ आली आहे."

हवामान बदलांच्याविरुद्ध मोहिमेचा चेहरा ठरलेल्या ग्रेटा यांनी वर्षभरापासून अभ्यासापासून अंतर बनवून ठेवले आहे आणि लोकांना बदलत्या हवामानाविषयी जागरूक करत आहे. नेत्यांवर निशाणा साधताना ती म्हणाली की, "आम्ही सर्व जण मोठ्या प्रमाणात विनाशच्या मार्गावर आहोत आणि आपण फक्त पैशाची आणि आर्थिक विकासाचीच चर्चा करीत आहात. तुमची असं करण्याची हिम्मत कशी झाली?" दुसरीकडे, रोहित सध्या दक्षिण आफ्रिकाविरूद्ध मालिकेत व्यस्त आहे. तीन  सामन्यांच्या टी-20 मालिकेमध्ये तो काही खास करू शकला नाही, परंतु आता २ ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या कसोटी मालिकेत सलामीवीर म्हणून तो उतरेल तेव्हा त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील.