IND vs SA 2nd Test: भारतीय संघाने केपटाऊन कसोटीत (Cape Town Test) दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेट्सने पराभव (IND Beat SA) करून इतिहास रचला. हा विजय भारतासाठी अनेक अर्थांनी खास होता. केपटाऊन येथील न्यूलँड्स येथे टीम इंडियाचा (Team India) हा पहिला कसोटी विजय होता. भारतीय संघ येथे कसोटी जिंकणारा पहिला आशियाई संघही ठरला. एवढेच नाही तर केपटाऊनमध्ये कसोटी सामना जिंकणारा रोहित शर्मा (Rohit Sharma) हा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. त्यांच्या आधी केवळ भारतातच नाही तर संपूर्ण आशिया खंडातील कोणताही कर्णधार हे करू शकला नव्हता. (हे देखील वाचा: IND vs AFG T20 Series 2024: दक्षिण आफ्रिकेनंतर भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार तीन सामन्यांची टी-20 मालिका, येथे पाहून घ्या संपूर्ण वेळापत्रक)
रोहित शर्माने केली धोनीची बरोबरी
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने सध्याची मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली आहे. याआधी भारताचा एकच कर्णधार एमएस धोनी ही कामगिरी करू शकला होता. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2010-11 मध्ये आफ्रिकेतील कसोटी मालिका अनिर्णित ठेवली होती. आता 2023-24 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने येथे कसोटी मालिका अनिर्णित ठेवली आहे. याशिवाय मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड यांसारखे कर्णधारही दक्षिण आफ्रिकेत तसे करू शकले नाहीत. विशेष म्हणजे भारताने येथे एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही.
दक्षिण आफ्रिकेतील 9वी मालिका
भारतीय संघाची दक्षिण आफ्रिकेतील ही 9वी कसोटी मालिका होती. याआधी भारताने येथे सात मालिका गमावल्या असून केवळ एक मालिका अनिर्णित राहिली होती. रोहित शर्मा हा एकमेव कर्णधार आहे ज्याने आपल्या नेतृत्वाखाली येथे एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. त्याच्याशिवाय भारताचे सर्व कर्णधार आणि अगदी एमएस धोनीनेही कसोटी मालिका गमावली आहे.
दक्षिण आफ्रिकेत नेतृत्व करणारे भारतीय खेळाडू
मोहम्मद अझरुद्दीन - (1-0 पराभव) 4 सामन्यांची मालिका, 1992/93
सचिन तेंडुलकर (2-0 पराभव) 3 सामन्यांची मालिका, 1996/97
सौरव गांगुली (1-0 पराभव) 2 सामन्यांची मालिका, 2001/02
राहुल द्रविड (2-1 पराभव) 3 सामन्यांची मालिका, 2006/07
एमएस धोनी (1-1 अनिर्णित) 3 सामन्यांची मालिका, 2010/11
एमएस धोनी (1-0 पराभव) 2 सामन्यांची मालिका, 2013/14
विराट कोहली (2-1 पराभव) 3 सामन्यांची मालिका, 2017/18
विराट कोहली (2-1 पराभव) 3 सामन्यांची मालिका, 2021/22
रोहित शर्मा (1-1 अनिर्णित) 2 सामन्यांची मालिका, 2023/24