Rohit Sharma's most Duck in IPL: रोहित शर्माने चाहत्यांची केली निराशा, आयपीएलमध्ये केला 'हा' लाजिरवाणा विक्रम
Rohit Sharma (Photo Credit - Twiter)

MI vs RR, IPL 2024 14th Match: आयपीएल 2024 मधील 14 वा (IPL 2024) सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स (MI vs RR) यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात चाहत्यांना रोहित शर्माकडून (Rohit Sharma) उत्कृष्ट खेळी आणि भरपूर चौकार आणि षटकारांची अपेक्षा होती पण रोहितने चाहत्यांची निराशा केली. यानंतर रोहित शर्माच्या नावावर एक अतिशय लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे. सामन्यातील पहिल्याच चेंडूवर रोहित शर्मा बाद झाला. रोहितला राजस्थानचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. रोहित शर्मा आयपीएलमध्ये आतापर्यंत 17 वेळा गोल्डन डकवर आऊट झाला आहे. रोहितपूर्वी आरसीबीचा दिनेश कार्तिकही आयपीएलमध्ये 17 वेळा गोल्डन डकवर आऊट झाला आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक गोल्डन डकवर आऊट झालेले खेळाडू

रोहित शर्मा- 17 वेळा

दिनेश कार्तिक- 17 वेळा

पियुष चावला- 15 वेळा

मनदीप सिंग- 15 वेळा

ग्लेन मॅक्सवेल- 15 वेळा

सुनील नारायण- 15 वेळा

ट्रेंट बोल्टची धोकादायक गोलंदाजी

या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टची अत्यंत धोकादायक गोलंदाजी पाहायला मिळाली. बोल्टने पहिल्याच षटकात मुंबई इंडियन्सला दोन मोठे धक्के दिले. प्रथम रोहित शर्मा आणि नंतर नमन धीर यांना खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये पाठवण्यात आले. पॉवरप्लेमध्येच मुंबई इंडियन्सने आपल्या टॉप-4 फलंदाजांच्या विकेट्स गमावल्या आहेत.