भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2022) पाकिस्तानविरुद्ध नाणेफेक करत इतिहास रचला आहे. तो आता भारतासाठी सर्वाधिक टी-20 विश्वचषक सामने खेळणारा खेळाडू बनला आहे. या प्रकरणात त्याने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला (MS Dhoni) मागे टाकले आहे. रोहित विक्रमी आठवा T20 विश्वचषक खेळत आहे आणि आता तो सर्वाधिक T20 विश्वचषक सामने खेळणारा भारतीय बनला आहे. रोहितने 2007 मध्ये T20 विश्वचषकात पदार्पण केले आणि त्यानंतर तो प्रत्येक विश्वचषकाचा भाग होता. पाकिस्तानविरुद्धचा सामना हा त्याचा 34 वा सामना आहे. धोनीबद्दल बोलायचे झाले तर त्याने 2007 ते 2016 पर्यंत एकूण 33 सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. तर युवराज सिंहने एकूण 31 सामने खेळले. (हे देखील वाचा: IND vs PAK T20 WC 2022: राष्ट्रगीतादरम्यान कॅप्टन रोहित शर्मा झाला भावूक (Watch Video)
भारतासाठी सर्वाधिक T20 विश्वचषक खेळलेले खेळाडू
रोहित शर्मा: 34 (2007-22)
एमएस धोनी: 33(2007-16)
युवराज सिंग: 31(2007-16)
सुरेश रैना: 26 (2009-2016)
विराट कोहली: 22 (2012-22)
रोहितकडे पहिल्यांदाच टी-20 विश्वचषकाची कमान
विशेष म्हणजे रोहित शर्मा पहिल्यांदाच टी-20 विश्वचषकात टीम इंडियाची धुरा सांभाळत आहे. विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर त्याला सर्व फॉरमॅटसाठी भारताचा कर्णधार बनवण्यात आले. मात्र, एक खेळाडू म्हणून रोहित सात वेळा टी-20 विश्वचषक स्पर्धेत सहभागी झाला आहे आणि यावेळी तो विक्रमी आठव्यांदा विश्वचषक खेळत आहे. रोहित बांगलादेशच्या शाकिब अल हसनसोबत सर्वाधिक टी-20 विश्वचषक खेळण्याच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे.