IND vs PAK T20 WC 2022: राष्ट्रगीतादरम्यान कॅप्टन रोहित शर्मा झाला भावूक (Watch Video)

मेलबर्न क्रिकेट मैदानावरील हाऊसफुल्ल स्टेडियमवर रोहित शर्माने (Rohit Sharma) नाणेफेक जिंकून पाकिस्तानला फलंदाजीसाठी आमंत्रित केले.

IND vs PAK T20 WC 2022: राष्ट्रगीतादरम्यान कॅप्टन रोहित शर्मा झाला भावूक (Watch Video)
Photo Credit - Twitter

आयसीस टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) मध्ये टीम इंडियाने पाकिस्तान (IND vs PAK) विरुद्धच्या सामन्याने आपला प्रवास सुरु केला आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानावरील हाऊसफुल्ल स्टेडियमवर रोहित शर्माने (Rohit Sharma) नाणेफेक जिंकून पाकिस्तानला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघ राष्ट्रगीतासाठी मैदानावर पोहोचले. पाकिस्तानच्या पाठोपाठ भारताचे राष्ट्रगीत वाजले. राष्ट्रगीत संपताच रोहित शर्मा भावूक झाला. कर्णधार म्हणून रोहित शर्माची आयसीसीची ही पहिलीच स्पर्धा आहे. रोहित शर्मा गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकानंतर टीम इंडियाचा कर्णधार झाला.

पहा व्हिडीओ

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 23, 2022 02:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).