ऑस्ट्रेलिया मधूनभारतात आल्यानंतर रोहित शर्माला पत्नी रितिका सजदेह हिच्यासह मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळ पाहिले गेले. खर तर एवढ्या हेक्टिक शेड्यूल नंतर खेळाडू आराम करणे पसंत करतात. आणि तसेच करायला ही हवे मात्र 33 वर्षीय रोहित शर्मा एवढ्या मोठ्या क्रिकेट मॅच नंतर ही पत्नीसह मुंबईत मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळ फिरताना पहायला मिळाला. यावेळी रोहित आणि पत्नीने सध्या सुरु असलेल्या कोविडच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन ही केले होते.दोघांनीही चेहऱ्यावर मास्क लावले होते.दरम्यान 33 वर्षीय बल्लेबाज रोहित ने ऑस्ट्रेलियामध्ये चांगली कामगिरी केली. (Syed Mushtaq Ai Trophy 2021 स्पर्धेतून माघार घेणं दीपक हुड्डाला पडलं महागात, BCA ने देशांतर्गत हंगामासाठी केली निलंबनाची कारवाई )
जिथे त्याने दोन कसोटी सामन्यांमध्ये 52 रन केले त्यामध्ये सर्वोत्कृष्ट स्कोअर 52 आहे.जरी त्यांची संख्या आश्चर्यचकित होऊ शकत नाही मात्र नवीन चेंडूला स्विंग करण्याच्या त्याच्या प्रतिकारामुळे अखेरच्या दोन कसोटी सामन्यात भारताला फायदा झाला. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे तो मर्यादित षटकांच्या मालिकेत आणि पहिल्या दोन कसोटी सामन्यांचा भाग नव्हता. त्यानंतर त्याने बंगळुरुमधील नॅशनल क्रिकेट अकॅडमी (National Cricket Academy) येथे आपल्या फिटनेसवर काम केले आणि नंतर त्याला पुन्हा राष्ट्रीय संघात परत बोलावले गेले.
पाहूयात रोहित आणि रितिका चे गेट वे ऑफ इंडियाजवळील काही फोटो.