रोहित शर्मा (Photo Credit: Getty Images)

रोहित शर्मा (Rohit Sharma) याने 2019 मध्ये संपूर्ण जगाच्या गोलंदाजांवर प्रभुत्व गाजवले आणि बऱ्याच धावा केल्या. तथापि, विश्वचषक 2019 मध्ये 5 शतकं झळकावूनही तो टीम इंडियाला अजिंक्यपद मिळवू देऊ न शकण्याचे दुःख आहे, पण एकंदरीत पाहिले तर रोहितसाठी हे वर्ष एक स्वप्नवत राहिले. फक्त फलंदाजच नाही तर रोहितने एक कर्णधार म्हणूनही स्वतःला सिद्ध केले. सलामी फलंदाज म्हणून रोहितने सर्वाधिक धावा केल्या आणि सनथ जयसूर्या (Sanath Jayasuriya) याचा विक्रम मोडला. वर्ष 2019 मधे रोहितने वनडेमध्ये सर्वाधिक धावा केल्या आणि क्रिकेट विश्वातील अव्वल फलंदाज बनला. रोहित फक्त फलंदाज म्हणून नावाजला नाही, तर तो सर्व फॉर्मेटमध्ये भारतासाठी परिपूर्ण मॅच विनर म्हणून उदयास आला. रोहितने सर्व विजय सामन्यात मिळून 1921 धावा केल्या, एका दशकात फलंदाजाने केलेल्या या चौथ्या सर्वाधिक धावा आहेत. रोहितच्या आकडेवारीवरून असे कळते की 2019 त्याच्यासाठी किती शानदार होता. (Year Ender 2019: रोहित शर्मा याने टी-20 क्रिकेटमध्ये केलेले 'हे' 3 रेकॉर्डस् विराट कोहली क्वचितच मोडू शकेल)

2019, हे रोहितसाठी कधीही न विसरणारे होते. त्याने 75.95 च्या स्ट्राईक रेटने 6 डावांमध्ये 556 धावा केल्या आणि टेस्टमध्ये सलामी फलंदाज म्हणून पदार्पणाच्या मालिकेत तीन शतकंही केली. 2019 मध्ये कोणत्याही फलंदाजासाठी (किमान 500 धावा) त्याची फलंदाजीची सरासरी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ 74.23 याच्या पुढे आहे. यावर्षी फक्त चौकार आणि षटकारांसह सर्वाधिक वनडे धावा करण्याच्या बाबतीत तो जगातील प्रथम क्रमांकाचा फलंदाज सिद्ध झाला. शिवाय, त्याची भारतात खेळतानाची सरासरी 83.33 राहिली. घरच्या मैदानावर खेळतानाचीही डॉन ब्रॅडमॅन (Don Bradman) यांच्यानंतरची दुसरी सर्वात जास्त सरासरी आहे.

12 जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यातून 2019 ची सुरुवात करणाऱ्या रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे शतक झळकावले. त्याचनंतर कसोटी सामन्यात त्याने यावर्षी ऑक्टोबरमध्ये डावाची सुरुवात करताना त्याने शानदार शतकंही केले. टी-20 मध्ये त्याने खास प्रदर्शन केले नसले तरीही वनडे आणि टेस्टमधील कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. हे वर्ष रोहितने रेकॉर्डस् ने भरपूर होते.

आणि सरत्या वर्षात जसे त्याने एका-मागोमाग एक मोठे विक्रम केले, तसेच पुढील वर्षीही याच कामगिरीची पुनरावृत्ती करेल आणि आगामी वर्षातदेखील रोहित त्याची प्रभावी कामगिरी कायम ठेवेल हीच सर्व चाहत्यांची अपेक्षा आहे.