वर्ष 2019 टीम इंडियासाठी (Team India) कोणत्याही सुवर्ण वर्षापेक्षा कमी नव्हते. भारतीय संघाने सर्व फॉरमॅट (टी-20, वनडे आणि टेस्ट) मध्ये प्रभावी कामगिरी केली. यावर्षी संघासाठी मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार या गोलंदाजांनी सर्वांना आपल्या कामगिरीने प्रभावित केले, तर कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि मर्यादित षटकात उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी फलंदाजीने क्रिकेट विश्वात छाप पाडली. दोन्ही फलंदाजांमध्ये एकमेकांच्या वरचढ होण्याचे प्रयत्न सुरु होते. वर्षअखेरीस दोघांनी आंतराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक धावांच्याबाबतीत संयुक्तपणे अव्वल स्थान मिळवले, तर वनडेमध्ये रोहितने यंदा सर्वाधिक धावांची नोंद केली. शिवाय, रोहितने यंदा टेस्ट क्रिकेटमध्ये रोहितने सलामी फलंदाज म्हणून आपली छाप पडली. पण, दोघांमध्ये टी-20 क्रिकेटमध्ये चांगलीच लढत पाहायला मिळाली. (Year Ender 2019: रोहित शर्मा याच्यासाठी हे वर्ष ठरले अद्वितीय, विविध विक्रम रचत ठरला 'हिटमॅन 2019')
दोघांनी टी-20 क्रिकेटयामध्ये प्रत्येकी 2633 धावा केल्या आहेत. कोहलीने 75 सामने खेळताना 70 डावात हा आकडा गाठला, तर रोहितने 104 सामने खेळताना 96 डावांमध्ये हा आकडा गाठला. दोन्ही खेळाडू धावांच्या तुलनेत बरोबरीत राहिले असले तरीही रोहितने टी-20 क्रिकेटमध्ये असे काही विक्रम केले आहेत, ज्याच्या आसपास कोहलीला येणे जवळपास कठीणच आहे.
1. टी -20 क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतक:
2017 मध्ये रोहितने श्रीलंकेविरुद्ध इंदोर येथे अवघ्या 35 चेंडूत टी -20 शतक झळकावले होते. खेळाच्या या छोट्या स्वरूपात विराट अजून एकही शतक लागावी शकला नाही. मात्र, वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या मॅचमध्ये त्याने त्याच्या सर्वोत्तम नाबाद 94 धावांची नोंद केली. शिवाय, आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळत कोहलीने 47 चेंडूंत सर्वात वेगवान शतक झळकावले आहे. अशा परिस्थितीत रोहितने केलेला हा विक्रम मोडणे जवळजवळ कोहलीने मोडून काढणे अशक्यच वाटते आहे.
2. टी -20 मधील सर्वाधिक षटकार:
रोहितने आजवर भारतासाठी 104 टी-20 सामने खेळले आहेत. यात त्याने एकूण 120 षटकार लगावले आहेत. दुसरीकडे, विराटने 75 मॅचमध्ये 71 षटकार ठोकले आहेत. कोहलीचा क्रिकेट खेळण्याचा मार्ग बचावात्मक आहे. ज्यामुळे तो मैदानात काळजीपूर्वक खेळताना दिसतो. हे सर्व पाहता असे म्हटले जाऊ शकते की, कोहली षटकारांच्या बाबतीत रोहितला क्वचितच मागे ठेवू शकेल.
3. टी -20 क्रिकेटमधील सर्वाधिक शतकं:
रोहितने टी-20 क्रिकेटमध्ये आजवर 104 सामने खेळले असून 96 डावांमध्ये 19 अर्धशतकं आणि चार शतकं केली आहेत, तर विराटने या रूपात एकही शतक नोंदवले नाही. रोहित टी-20 मध्ये टीम इंडियासाठी डावाची सुरुवात करतो, त्यामुळे त्याच्याकडे मोठा डाव खेळण्यासाठी जास्त वेळही असतो, पण विराट तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. अशा परिस्थितीत रोहितच्या सर्वोच्च शतकांचा विक्रम मोडणे विराटसाठी अवघड आहे.
रोहितने डर्बन येथे 19 सप्टेंबर 2007 रोजी टी-20 सामन्यात डेब्यू केले होते, तर कर्णधार विराटने 12 जून 2010 रोजी झिम्बाब्वेविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.