रोहित शर्मा (Photo by Alex Davidson/Getty Images)

2019 हे वर्ष टीम इंडियाचा अनुभवी सलामी फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यासाठी साठी अद्वितीय राहिले. 'हिटमॅन' 'रोहित यावर्षी आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतर फॉरमॅटमध्येही रोहितने सातत्याने धावा करणे कायम ठेवले. आयसीसी विश्वचषक (ICC World Cup) 2019 मध्ये 32 वर्षीय रोहितने विक्रमी 5 शतकं केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेच्या 4 डावात त्याने 3 शतकं ठोकली. यावर्षी कसोटीत सलामी फलंदाज म्हणून त्याला मैदानात उतरविण्यात आले होते. आणि मर्यादित षटकानंतर टेस्टमध्येही सलामी फलंदाज म्हणून आपली योग्यता सिद्ध केली. रोहितने यावर्षी 28 वनडे सामन्यांमध्ये 57.30 च्या सरासरीने एकूण 1,490 धावा केल्या ज्यामध्ये त्याने 7 शतकं आणि 13 वेळा 50 अधिक धावा केल्या. शिवाय, रोहितनेयावर्षी इतर फलंदाजांच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3 अधिक शतकं ठोकली. तथापि, कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत तो विराट कोहली च्या अवघ्या 13 धावांच्या मागे राहिला. (क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवडली Test आणि ODI Team Of Decade; एमएस धोनी वनडे तर, विराट कोहली टेस्ट कॅप्टन)

वर्ष 2019 मध्ये रोहितनेआंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बनवलेल्या काही मोठ्या विक्रमाबद्दल आपण जाणून घेऊया: -

1. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध मालिकेतून रोहितने पहिल्यांदाटेस्टमध्ये सलामी फलंदाज म्हणून पदार्पण केले. ही मालिका रोहितसाठी अतिशय खास ठरली. कसोटी क्रिकेटमध्ये सलामी फलंदाज म्हणून रोहित पहिल्या सामन्याच्या दोन्ही डावात शतक ठोकणारा जगातील पहिला फलंदाज ठरला. विशाखापट्टणम येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने हे कामगिरी केली. रोहितने पहिल्या डावात 176 धावा केल्या तर सलामीवीर म्हणून दुसऱ्या डावात 127 धावा केल्या. या कसोटीत त्याने एकूण 303 धावा केल्या, जे सलामी फलंदाज म्हणून पहिल्या कसोटीतील कोणत्याही फलंदाजाच्या सर्वोच्च धावा आहेत.

2. श्रीलंकेचा दिग्गज कुमार संगकारा नंतर विश्वचषक स्पर्धेत सलग 3 शतकं ठोकणारा रोहित जगातील दुसरा फलंदाज ठरला. 2015 च्या विश्वचषकात संगकाराने सलग चार शतके केली होती. शिवाय, विराटनंतर कोहली वनडेमध्ये शतकांची हॅटट्रिक करणारा दुसरा फलंदाज ठरला. शिवाय, विश्वचषकातील एकाच आवृत्तीत तब्बल पाच शतक करणारारोहित पहिला खेळाडू ठरला. यासह त्याने सचिन तेंडुलकर याची बरोबरी केली. रोहित आणि सचिनने विश्वचषकमध्ये एकूण 6 शतकं केली आहेत.

3. रोहितने यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 10 शतकं केली. यावेळी त्याने वेगवेगळ्या संघांविरुद्ध (दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, इंग्लंड, बांग्लादेश आणि श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका) 7 शतकं केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या एका कॅलेंडर वर्षात 7 वेगवेगळ्या संघांविरुद्ध शतक झळकावणारा रोहित पहिला खेळाडू आहे.

4. रोहितने यावर्षी वनडे क्रिकेटमध्ये एकूण 7 शतकं केली. एका कॅलेंडर वर्षात सौरव गांगुली आणि ऑस्ट्रेलियाचा सलामी फलंदाज डेव्हिड वॉर्नर यांनीही अनुक्रमे 2000 आणि 2016 मध्ये हे कामगिरी केली आहे. या यादीमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहे, ज्याने 1998 मध्ये 9 शतके ठोकली होती.

5. कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 सामन्यात सलामी फलंदाज म्हणून शतक करणारा रोहित पहिला भारतीय खेळाडू ठरला. सलामीवीर म्हणून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याने 176 धावा केल्या.

6. कसोटी क्रिकेटमध्ये रोहित भारतात खेळताना सलग सात अर्धशतक करणारा पहिला खेळाडू ठरला. त्याने 2016 ते 2019 च्या दरम्यान सात कसोटी अर्धशतकं केली आहेत. एव्हर्टन वीक्स (1948/49), राहुल द्रविड (1997/98) आणि अ‍ॅंडी फ्लॉवर (1999/2000) यांनी या फॉर्मेटमध्ये सलग सहा अर्धशतकांची नोंद केली.

7. डावाची सुरुवात करताना एका कॅलेंडर वर्षात दहा शतकं ठोकणारा रोहित पहिला क्रिकेटपटू ठरला. यापूर्वी, 1998 मध्ये सचिन तेंडुलकर, 1998 मध्ये ग्रॅम स्मिथ आणि 2016 मध्ये डेव्हिड वॉर्नरने आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सलामीवीर म्हणून प्रत्येकी 9 शतकांची नोंद केली.

8. रोहितने यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 78 षटकार ठोकले आणि आपलाच जुना विश्वविक्रम मोडला. वर्ष 2018रोहितने 74 आणि 2017 मध्ये 65 षटकार ठोकले.

9. रोहितने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध विशाखापट्टन कसोटी सामन्यात एकूण 13 षटकारांसहपाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अकरम याच्या 12 षटकारांना मागे टाकले. अकरमने 1996 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध सामन्यात हा पराक्रम केला होता.

10. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध रांची कसोटी सामन्यात रोहितने दुहेरी शतक झळकावले होते. रोहित कसोटी क्रिकेटमध्ये षटकार मारून दुहेरी शतक पूर्ण करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. रोहितच्या आधी सुमारे 13 खेळाडूंनी षटकार मारत कसोटीमध्ये 200 धावा पूर्ण केल्या. नंतर बांग्लादेशविरुद्ध इंदोर कसोटीत मयांक अग्रवाल या यादीत सामिल झाला.

11. सर्वाधिक टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा रोहित पाकिस्तानच्या शोएब मलिकनंतर दुसरा फलंदाज बनला. त्याने आजवर 104 टी -20 सामने खेळला आहे तर पाकिस्तानचा अष्टपैलू शोएबने 119 टी -20 आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे.

12. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील रोहित हा एकूण तिसरा आणि पहिला भारतीय फलंदाज बनला. रोहितच्या आधी विंडीजचा सलामी फलंदाज क्रिस गेल आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी यांनी ही कामगिरी केली आहे

13. 2019 विश्वचषकात रोहितने सर्वाधिक 648 धावा केल्या. कोणत्याही एक विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित सचिन तेंडुलकर (673) आणि मॅथ्यू हेडन (659) नंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे.

14. सलामी फलंदाज म्हणून रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कॅलेंडर वर्षात एकूण 2,442 धावा केल्या. यावेळी त्याने श्रीलंकेचा माजी स्फोटक फलंदाज सनथ जयसूर्या (2,387) याचा विक्रम सोडला, जो त्याने 1997 मध्ये बनवला होता.

15. रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आजवर भारतात एकूण 191 षटकार लगावले आहेत. यापूर्वी, भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देशांतर्गत मैदानावर 186 षटकार लगावले आहेत.

2019 हे रोहितसाठी खास वर्ष ठरले कारण त्याने वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थान गाठले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रारूपांमध्ये सर्वाधिक धावा केल्या. क्रिकेट विश्वचषक त्याच्यासाठी रेकॉर्डब्रेकिंग ठरले. शिवाय, त्याला टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्यांदा भारताकडून डावाची सुरुवात करायचीही संधी मिळाली.