MS Dhoni-Rohit Sharma Comparison: सुरेश रैनाने एमएस धोनी-रोहित शर्माची केली तुलना, पुढचा धोनी म्हणून टॅग केल्यावर 'हिटमॅन' म्हणाला-'असं होऊ नये'
एमएस धोनी-रोहित शर्मा (Photo Credit: Getty)

सलामी फलंदाज म्हणून टीम इंडियामध्ये सुरुवात केल्यापासून रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कारकीर्दीत अनुकरणीय वाढ झाली आहे. रोहितने अनेक विक्रमांची नोंद केली आहे. आंतरराष्ट्रीय यशाबरोबरच रोहितने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) चारही विजेतेपद देऊन विजय मिळविला आहे. नुकतच काही काळ भारतीय संघातून बाहेर असलेल्या सुरेश रैनाने (Suresh Raina) रोहितची प्रशंसा केली आणि कर्णधारपदाच्या दृष्टीने पुढील महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) असल्याचा दावाही केला. सुपर ओव्हर पॉडकास्ट दरम्यान रैनाने सांगितले की, “मी म्हणेन की रोहित भारतीय क्रिकेट संघाचा पुढील धोनी आहे. मी त्याला पाहिले आहे, तो शांत आहे, त्याला ऐकायला आवडते, खेळाडूंना आत्मविश्वास देणे त्याला आवडते आणि त्याही शेवटी त्याला पुढाकाराने नेतृत्व करण्यास आवडते. जेव्हा कर्णधार पुढाकार घेतो आणि त्याच वेळी ड्रेसिंग रूमच्या वातावरणास आदर देतात तेव्हा आपल्याला हे माहित असते की आपल्याकडे हे सर्व आहे.” (Rohit Sharma's First Pay Check: रोहित शर्माला क्रिकेटमधून मिळालेली पहिली कमाई किती होती आणि ती त्याने कशी खर्च केली? कोट्यवधींची मालमत्ता असणाऱ्या हिटमॅनएने केला खुलासा)

रविवारी ट्विटरवर प्रश्नोत्तराच्या सत्रात रोहित चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना सामोरे गेला आणि रैनाच्या ठळक विधानावरही प्रत्युत्तर दिले. मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणाला, “हो, मी सुरेश कडून ही टिप्पणी ऐकली आहे. धोनी एक प्रकारचा आहे आणि कोणीही त्याच्यासारखा असू शकत नाही आणि तुलना यासारखी करता कामा नये, प्रत्येक व्यक्ती वेगळी असते आणि त्यांचे सामर्थ्य व कमकुवतपणा आहेत.”

दोन्ही भारतीय फलंदाजांना आपापल्या आयपीएल फ्रँचायझीसह मिळवलेल्या यशामुळे रोहितची अनेकदा धोनीशी तुलना केली जाते. रोहित 4 विजेतेपदांसह आयपीएलच्या इतिहासात सर्वात यशस्वी कर्णधार आहे तर धोनी 3 विजेतेपदासह दुसर्‍या क्रमांकावर आहे. दरम्यान, सप्टेंबर-नोव्हेंबर विंडोमध्ये युएईमध्ये होणाऱ्या आयपीएलच्या तेराव्या आवृत्तीत दोन्ही कर्णधार कसे कामगिरी करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कोरोनाचे संकट सर्वत्र पसरले असताना, क्रीडा मंत्रालयाने युएईमध्ये टी -20 लीग आयोजित करण्यास परवानगी दिली आहे. बहुप्रतिक्षित स्पर्धेचे आयोजन 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत दुबई, अबू धाबी आणि शारजाह येथे होईल.