स्टार भारतीय फलंदाज रोहित शर्माने (Rohit Sharma) रविवारी ट्विटरवर आपल्या चाहत्यांसमवेत प्रश्न-उत्तर सत्र आयोजित केले. भारतीय संघाच्या मर्यादित ओव्हरच्या उप-कर्णधाराने क्रिकेटपासून त्याच्या वैयक्तिक जीवनापर्यंतच्या चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. एका चाहत्याच्या विचारण्यावरून रोहितने क्रिकेटमधील त्याच्या पहिल्या पेचेकची (Rohit Sharma Paycheck) रक्कमही उघड केली. मुंबईचा रहिवासी रोहित अत्यंत नम्र पार्श्वभूमीचा असून प्रसिद्धी मिळवण्यापूर्वी तो शहरातील रस्त्यांवर क्रिकेट खेळायचा. रोहित मुंबईच्या प्रसिद्ध आझाद मैदानावर (Azad Maidan) खेळाच्या युक्त्या शिकला जिथे महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातून हजारो मुले क्रिकेट शिकण्यासाठी येतात. आज कोट्यवधींची मालमत्ता असणाऱ्या रोहितने उघडकीस आणले की त्याचा पहिला पहिले वेतन चेकद्वारे मिळाले नसून ते त्याच्या सोसायटी जवळच्या मित्रांसमवेत खेळताना मिळवलेली 50 रोख रक्कम होती. (13 Years of Hitman: रोहित शर्माने आजच्या दिवशी 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केले होते डेब्यू, 6 वर्षे 'फ्लॉप' राहिल्यानंतर आज लगावला आहे शतकांचा अंबार)
“माझी पहिली वेतनश्रेणी चेकद्वारे आली नव्हती, ही रोकड होती जे मला माझ्या सोसायटीजवळ क्रिकेट खेळताना मिळाले होते. माझ्या मित्रांसोबत रस्त्याच्या कडेला वडा पाव खाऊन ही रक्कम मी खर्च केली,” रोहितने चाहत्याला उत्तर दिले. दुसरीकडे, एका चाहत्याने त्याला भूतकाळातील गोलंदाजाविरुद्ध खेळायला आवडेल अशा गोलंदाजीची निवड करण्यास सांगितले तेव्हा रोहितने ऑस्ट्रेलियाचा महान ग्लेन मॅकग्रा याचा सामना करायला आवडेल असे म्हटले.
Q: #askRo How much was your first paycheck worth and at what age did you get it? How did you spend it, with friends or family?
— Rohit Sharma (@ImRo45) August 2, 2020
गेल्या काही वर्षांत हिटमनने भारतासाठी सर्वाधिक नियमित धावा केल्या आणि 2019 विश्वचषक स्पर्धेत त्याने नऊ सामन्यांत 81.00 च्या सरासरीने सर्वाधिक 648 धावा केल्या होत्या. दरम्यान, रोहित सध्या इतर भारतीय क्रिकेटपट्यांप्रमाणेच मुंबईतील त्याच्या घरीच कैद आहे पण तो लवकरच आयपीएलसाठी युएई येथे रवाना होईल. युएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पुढील आवृत्तीत तो गतविजेत्या मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना दिसेल. सर्व संघ या महिन्यात सराव पुन्हा सुरू करण्यासाठी युएईला रवाना होतील.