जवळपास प्रत्येक देशात क्रिकेटप्रेमी आढळतील. या पैकी काही चाहते या क्षेत्रात कठोर परिश्रम करून करिअर बनवू इच्छित असतात. तसेच काही खेळाडूंची प्रतिभा त्यांच्या देशवासीयांनी ओळखली नाही ज्यामुळे आता त्यांनी आपल्या देशाची सीमा ओलांडून दुसऱ्या देशासाठी खेळत यश आणि प्रसिद्धी मिळवली. या लेखात जगभरातील अशाच 5 महान क्रिकेटपटूंबद्दल जाणून घेऊया. हे पाचही खेळाडू परदेशी भूमीवर जन्मले होते, परंतु त्यांनी क्रिकेट खेळण्यासाठी दुसऱ्या देशाची निवड केली. विशेष म्हणजे या पाचही क्रिकेटपटुंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर संघासाठी मोलाची भूमिका बजावली आहे. (भारतीय वंशाच्या मुलीच्या प्रेमात पाकिस्तानी क्रिकेटपटू येडापीसा, स्वत:चा देश सोडून 'हा' दिग्गज फिरकीपटू झाला दक्षिण आफ्रिकेचा नागरिक)
रॉबिन सिंग (Robin Singh)
भारताकडून काही प्रसिद्ध अष्टपैलू खेळले आहेत आणि रॉबिन सिंह यापैकी एक आहेत. तथापि फार कमी जणांना हे माहित असेल की, सिंह यांचा जन्म भारतात नव्हे तर जन्म 14 सप्टेंबर 1963 रोजी त्रिनिदाद, कॅरिबियन येथे झाला होता. विशेष म्हणजे त्यांनी विंडीजसाठी 1989 मध्ये पदार्पण करून 136 वनडे सामन्यात 2336 धावा केल्या. त्यांनतर, 1998 मध्ये भारतासाठी फक्त 1 कसोटी तर 2001 मध्ये शेवटचा वनडे सामना खेळाला आणि 2004 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. ते भारतातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक मानला जाते.
अँड्र्यू सायमंड्स (Andrew Symonds)
ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज सायमंड्सचा जन्म 9 जून 1975 रोजी युनायटेड किंगडमच्या बर्मिंघॅम शहरात झाला. सायमंड्सने ऑस्ट्रेलियाकडून क्रिकेटमध्ये प्रवेश केला. त्याने आपल्या संघासाठी 26 कसोटी सामन्यात 40.6 च्या सरासरीने 1462 धावा केल्या. कसोटी क्रिकेट व्यतिरिक्त 198 वनडे सामन्यात 39.8 च्या सरारीने 5088 रन आणि 14 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 337 धावा केल्या आहेत.
जोफ्रा आर्चर (Jofra Archer)
2019 वर्ल्ड कपपूर्वी इंग्लंड संघाची आर्चरच्या रूपात मोठी लॉटरी लागली असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. आर्चरचा जन्म 1 एप्रिल, 1995 रोजी ब्रिजटाउन, बार्बाडोस येथे झाला. पण वेस्ट इंडिज संघातून सतत दुर्लक्षित होत असल्याने त्याने इंग्लंडची वाट धरली. त्याला वनडे विश्वचषकपूर्वी इंग्लिश संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. आर्चर या स्पर्धेत संघाचा सर्वोत्तम गोलंदाज म्हणून उदयास आला.
केविन पीटरसन (Kevin Pietersen)
इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी फलंदाज केविन पीटरसनचा जन्म 27 जून 1980 रोजी दक्षिण आफ्रिकेच्या पीटरमारिट्जबर्ग शहरात झाला. पण त्याने आफ्रिकेऐवजी इंग्लंडकडून खेळणे ठरवले. पीटरसनने इंग्लंडकडून 104 कसोटी क्रिकेट सामने खेळताना 47.3 च्या सरासरीने 8181 धावा केल्या आहेत. शिवाय, वनडे क्रिकेटमध्ये त्याने 136 सामन्यात 4440 धावा आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 37 सामने खेळले असून त्याने 1176 धावा केल्या आहेत. फलंदाजीशिवाय त्याने गोलंदाजीतही आपल्या संघासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे.
इमरान ताहिर (Imran Tahir)
दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज इमरान ताहिरचा जन्म 29 मार्च, 1979 मध्ये पाकिस्तान च्या लाहोर (Lahore) शहरात झाला होता, पण त्याने पत्नीच्या प्रेमासाठी देशाचा त्याग केला आणि आफ्रिकेत स्थायिक झाला.