India Legends vs South Africa Legends: Sachin Tendulkar याचा झंझावाती रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये धमाका, 30 चेंडूत ठोकले झंझावाती अर्धशतक
सचिन तेंडुलकर, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका लेजेंड्स (Photo Credit: Twitter)

Road Safety World Series: रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या त्यांच्या आजच्या सामन्यात शहीद वीर नारायणसिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर इंडिया लेजेंड्सचा (India Legends) सामना दक्षिण आफ्रिका लेजेंड्सशी (South Africa Legends) सुरु आहे. हा सामना जिंकत सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) नेतृत्वात इंडिया लेजेंड्स संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. सामन्यात दक्षिण आफ्रिका लेजेंड्स संघाने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशास्थितीत, संघासाठी सेमीफायनल जागेचा प्रश्न उद्भवल्याने कर्णधार सचिन तेंडुलकरने पुन्हा एकदा बॅटने कमाल केली आणि झंझावाती अर्धशतक ठोकले. रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये रविवारी मास्टर ब्लास्टर सचिन त्याच्या जुन्या अंदाजात दिसला आणि इंडिया लीजेंड्सकडून खेळत आफ्रिका लेजेंड्स संघाविरुद्ध तुफानी अर्धशतक झळकावले. सचिनने 30 चेंडूत पन्नाशी धावसंख्या पार केली, आणि अखेरीस 37 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 60 धावा केल्या. (COVID-19 टेस्ट करतेवेळी सचिन तेंडूलकरच्या ‘या’ कृतीने डॉक्टर दचकले, पहा नक्की काय घडले Watch Video)

मात्र अर्धशतक झळकावल्यानंतर तो जास्त वेळ क्रीजवर थांबू शकला नाही आणि 13व्या ओव्हरमधील शेवटच्या चेंडूवर बाद झाला. मोन्डे झोंडेकीने सचिनला पॅव्हिलियनला पाठवलं. इंडिया लेजेंड्सचे चार सामन्यांमधून 12 गुण असून ते गुणतालिकेत दुसर्‍या स्थानावर आहे. श्रीलंकेचा संघ 16 गुणांसह पहिल्या स्थानावर असून दक्षिण आफ्रिकेचा संघ आठ गुणांसह तिसर्‍या स्थानावर आहे. तथापि, इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाची कामगिरी चांगली नव्हती आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. इरफान पठाणच्या नाबाद 61 आणि मनप्रीत गोनीच्या नाबाद 5 धावांच्या मदतीने भारताने लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न केला पण अखेर त्यांना सहा धावांनी पराभवा सामोरे जावे लागले. भारतीय कर्णधार सचिन देखील बॅटने करण्यात अपयशी ठरला. स्पर्धेत यापूर्वी त्याची वैयक्तिक सर्वोच्च खेळी नाबाद 33 होती, जी त्याने बांग्लादेश लेजेंड्सविरुद्ध केल्या होत्या.

असा आहे इंडिया लेजेंड्स संघ: सचिन तेंडुलकर (कॅप्टन), वीरेंद्र सेहवाग, मोहम्मद कैफ, एस बद्रीनाथ, युवराज सिंह, यूसुफ पठान, इरफान पठान, मुनाफ पटेल, मनप्रीत सिंह गोनी, प्रज्ञान ओझा, आर विनय कुमार, नोएल डेविड आणि नमन ओझा.