Rishabh Pant Urges Ajinkya Rahane to Take Review (Photo Credits: Twitter)

भारत आणि ऑस्ट्रलिया यांच्यातील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना (IND vs AUS 4th Test) ब्रिस्बेन येथे सुरु आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकल्याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाच्या संघाने 5 बाद 274 धावा केल्या आहेत. दरम्यान, ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लाबुशेनने शतकी खेळी केली आहे. तर, भारताकडून पदार्पण करणाऱ्या टी नटराजन याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या आहेत. मात्र, या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंतने केलेल्या अपीलची सर्वाधिक चर्चा सुरु झाली आहे.

पहिला दिवसाचा खेळ संपण्याआधी काही षटके शिल्लक राहिली असताना टी नटराजनच्या एक चेंडू ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो चेंडू पेनच्या बॅटला स्पर्श करून आल्याने रिषभ पंतला वाटले. यामुळे त्याने जोरदार अपील केली. एवढेच नव्हेतर, कर्णधार अजंक्य रहाणेला रिव्ह्यू घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्नदेखील केला. परंतु, पण गोलंदाज नटराजन आणि स्लिपमध्ये उभे असलेले अजिंक्य रहाणे याच्यासह उपकर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांना कोणालाच तसे वाटले नाही. यामुळे ते सर्वजण मैदानातच हसू लागले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच हा व्हिडिओ आयसीसीने देखील त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. हे देखील वाचा- Syed Mushtak Ali Trophy साठी अर्जुन तेंडुलकर चं मुंबई च्या Senior Team मध्ये पदार्पण

व्हिडिओ-

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला तर, दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तर, तिसरा सामना अनिर्णित राहिला आहे. यामुळे ब्रिस्बेन येथे सुरु असलेल्या अखरेच्या कसोटी समान्यात विजय मिळवून मालिका खिश्यात घालण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्न करत आहेत.