Syed Mushtaq Ali Trophy साठी अर्जुन तेंडुलकरचं मुंबईच्या Senior Team मध्ये पदार्पण
Arjun Tendulkar | (Photo Credits: Twitter @HomeOfCricket)

भारताचा मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याची मुंबईच्या (Mumbai) सिनियर क्रिकेट टीममध्ये (Senior Team) निवड करण्यात आली आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) मधील हरियाणा विरुद्धच्या Elite E League मध्ये होणाऱ्या सामन्यात अर्जुन तेंडुलकर मुंबईच्या सिनियर टीममध्ये डेब्यू करणार आहे. (Danielle Wyatt on Facing Arjun Tendulkar: 'फारच धोकादायक'! इंग्लंड क्रिकेटपटू डॅनियल व्याटने नेट्समध्ये अर्जुन तेंडुलकरच्या चेंडू खेळण्याचा सांगितला अनुभव)

हा सामना मुंबईतील बीकेसी ग्राऊंडवर खेळला जात आहे. मुंबईने या सामन्यात टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मुंबईच्या सिनियर टीमसाठी खेळल्याने यंदाच्या होणाऱ्या आयपीएल ऑक्शनसाठी अर्जुन तेंडुलकर पात्र ठरला आहे.  बीसीसीआयने प्रत्येक संघाला 22 खेळाडू नेमण्याची परवानगी दिली होती. सलील अंकोला लीड करत असलेल्या निवड समितीने अर्जुन तेंडुलकर आणि Krutik Hanagavadi या दोन वेगवान गोलंदाजांची मुंबईच्या संघात निवड केली. (IPL 2020: अर्जुन तेंडुलकर ला यंदाच्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्स संघात स्थान? जाणून घ्या एका फोटोमुळे सुरू झालेल्या तर्क-वितर्कांमागील सत्य!)

दरम्यान, सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या पहिल्या दोन्ही सामन्यात मुंबईला पराभव पत्कारावा लागला होता. त्यामुळे आजचा सामना मुंबई संघासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्या मुंबईचा संघ असा आहे- यशस्वी जयस्वाल, आदित्य तरे, सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड, शिवम दुबे, सरफराज खान, शम्स मुलानी, अथर्व अंकोलेकर, अर्जुन तेंडुलकर, धवल कुलकर्णी, आकाश पारकर.

गेल्या काही वर्षांमध्ये अर्जुन तेंडुलकर मुंबई संघासाठी एज ग्रुप टुर्नामेंट खेळत होता. त्यासोबतच काही इन्व्हिटेशन टुर्नामेंटमध्येही तो सहभागी झाला होता. 2018 मध्ये झालेल्या अंडर 19 टीमच्या श्रीलंका दौऱ्यात देखील अर्जुन तेंडुलकर सहभागी होता. तसंच भारताच्या नॅशनल टीमसोबत अनेकदा तो नेट प्रॅक्टीस करतानाही दिसला आहे.