रिषभ पंत शून्यावर आऊट, Netizens ने ट्विटरवर ट्रोल करत संजू सॅमसन याला टीम इंडियात शामिल करण्याची केली मागणी
विराट कोहली आणि रोहित शर्माच्या खांद्यावर रिषभ पंत (Photo Credits: Twitter)

भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) संघातील 3 सामन्यांच्या मालिकेतील अंतिम टी-20 सामन्यत यजमान संघाने विजय मिळवत मालिका 2-1 ने जिंकली. या सामन्यात भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा याने बॅटने दोन सामन्यांनंतर पुन्हा धावा केल्या, तर रिषभ पंत (Rishabh Pant) पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. विराट कोहली (Virat Kohli) याने यावेळी पंतला फलंदाजीसाठी तिसऱ्या स्थानावर पाठवले पण त्याने निराश केले. मुंबईच्या वानखेडे स्टेडियम (Wankhede Stadium) मध्ये सामन्यात विंडीज कर्णधार किरोन पोलार्ड याने टॉस जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामी फलंदाज रोहितला बाद करत विराटऐवजी पंत फलंदाजीसाठी आला. या सामन्यात पंत एकही धाव ना करता पॅव्हिलियनमध्ये परतला. ज्यानंतर त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. (IND vs WI 3rd T20I: टीम इंडियाचा संघर्षपूर्ण विजय, वेस्ट इंडिजचा 67 धावांनी पराभव करत मालिकेत मिळवला 2-1 ने विजय)

नाणेफेक जिंकून वेस्ट इंडीजने भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. रोहित आणि राहुलने भारताला चांगली सुरुवात दिली. रोहित 71 धावांची शानदार खेळी केल्यावर बाद झाला. विराटने पुन्हा एकदा चकित करणारा निर्णय घेत पंतला फलंदाजीसाठी तिसर्‍या क्रमांकावर पाठवले. पंतने 2 चेंडूंचा सामना केला आणि पोलार्डच्या चेंडूवर जेसन होल्डर याच्याकडे झेलबाद झाला. त्याने शेवटच्या सात टी-20 डावात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येत पंतने 33, 18, 6, 27, 19, 4 धावा केल्या आहेत. ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 सामन्यात पंतने आपले शेवटचे अर्धशतक झळकावले होते. या सामन्यात 0 धावांवर बाद झाल्यानंतर चाहते पंतवर संतप्त आहेत आणि त्याला बीसीसीआयमधून काढून टाकण्याची मागणी करीत आहेत. पाहा पंतच्या निराशाजनक खेळीवर नेटिझन्सच्या प्रतिक्रिया:

पंत जेव्हा जेव्हा कोहली त्याला बॅटिंगला पाठवतो

पंतला पाहिल्यानंतर भारतीय चाहते

त्यांच्या खांद्यावर पंत !!

सॅमसनला संधी द्या

धैर्याचा अभाव

पंत निवृत्ती विधेयक?

दरम्यान, पहिले फलंदाजी करत भारताने दिलेल्या 241 धावांच्या प्रत्युत्तरात विंडीजला निर्धारित ओव्हरमध्ये 8 बाद 173 धावाच करता आल्या. विंडीजकडून कर्णधार किरोन पोलार्ड (Kieron Pollard) याने सर्वाधिक 68 धावा केल्या, तर शिमरोन हेटमायर (Shimron Hetmyer) याने 41 धावांचे योदान दिले. टीम इंडियाकडून कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर आणि मोहम्मद शमी याने  प्रत्येकी 2 गडी बाद केले. रोहित 71, राहुल 91 आणि कर्णधार विराट कोहली याने नाबाद 70 धावांची खेळी केली.