विराट कोहली (Photo Credit: AP/PTI Photo)

सध्या सुरू असलेल्या ट्रेंडमध्ये सामिल होत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) याने सोमवारी दशकातील कसोटी संघाची घोषणा केली आहे. नेहमीच्या संशयितांचा समावेश झाला असून, असे अनेक खेळाडू आहे ज्यांच्या निवडीमुळे काही वादविवाद होऊ शकतात. त्याने विराट कोहली (Virat Kohli) याला कर्णधार म्हणून नेमले आहे, तर नॅथन लायन (Nathan Lyon) याला एकमेव फिरकी गोलंदाज म्हणून सामिल केले आहे. अलीकडेच ट्विटरवर पदार्पण करणाऱ्या दोन वेळा विश्वचषक विजेत्या कर्णधाराने सोशल मीडियावर आपल्या स्टार-स्टडेड टीमचा खुलासा केला ज्यात सर्व प्रमुख क्रिकेट देशांच्या खेळाडूंचा समावेश केला आहे. दशकाच्या सुरूवातीस टेस्टमध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या इंग्लंड संघातील सर्वाधिक चार खेळाडू आहेत. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाकडे तीन खेळाडू आहेत तर भारत, श्रीलंका, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांचे पॉन्टिंगच्या दशकातील टेस्ट संघात प्रत्येकी एक खेळाडू आहे. (हर्षा भोगले यांनी निवडली 2019 ची टेस्ट, टी-20 आणि वनडे टीम XI; टीम इंडियाच्या 'या' क्रिकेटपटुंना केले सामिल)

या दशकातील त्याचा कसोटी संघ शेअर करताना ऑस्ट्रेलियाच्या या माजी फलंदाजाने लिहिले की, 'प्रत्येकजण या दशकाचा संघ निवडत आहे, म्हणून मलाही वाटायचे की मी देखील या मस्तीत सामील व्हावे. 2010 पासूनची हा असेल माझा टेस्ट संघ." या कसोटी संघात डेविड वॉर्नर आणि अ‍ॅलिस्टर कुक याला डावाची सुरुवात कार्याची जबाबदारी पन्टरने दिली आहे. तिसर्‍या क्रमांकावर त्याने केन विल्यमसन, स्टीव्ह स्मिथ याला चार आणि कर्णधार कोहलीला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी निवडले. या संघात पंटरने बेन स्टोक्स याच्या रूपात एक अष्टपैलू, 3 वेगवान गोलंदाज, एक फिरकी गोलंदाज सामिल केले आहे. विकेटकीपिंगची जबाबदारीत्याने श्रीलंकेचा महान कुमार संगकाराकडे सोपविली आहे. विशेष म्हणजे पॉन्टिंगने आपल्या काळातील कोणत्याही खेळाडूला या यादीत स्थान दिले नाही. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, मिसबाह-उल-हक, मायकेल क्लार्क, एबी डिव्हिलियर्स, एमएस धोनी यासारखे खेळाडूही त्याच्या काळात खेळले आहेत.

रिकी पॉन्टिंगची दशकाची टेस्ट टीमः

डेविड वॉर्नर, अ‍ॅलिस्टर कुक, केन विल्यमसन, स्टीव्ह स्मिथ, विराट कोहली (कॅप्टन), कुमार संगकारा (विकेटकीपर), बेन स्टोक्स, डेल स्टेन, नाथन लायन, स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन.