RCB vs SRH, IPL 2020 Live Streaming: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद (Photo Credit: File Image)

RCB vs SRH, IPL 2020 Live Streaming: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 13व्या 52व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात भिडत होणार आहे. डेविड वॉर्नरच्या (David Warner) नेतृत्वात खेळताना हैदराबादला प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची आशा कायम ठेवण्यासाठी या सामन्यात विजयाच्या निर्धारात असेल, तर या सामन्यात विजय मिळवून विराट कोहलीची (Virat Kohli) आरसीबी (RCB) प्ले ऑफमध्ये आपले स्थान सुरक्षित करू इच्छित असेल. आरसीबी आणि हैदराबाद यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल, तर टॉस अर्धातासपूर्वी म्हणजे 7:00 वाजता होईल. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना स्टार नेटवर्कवर लाईव्ह प्रसारित होईल, तर सामन्याचे लाईव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग Disney+ Hotstar वर उपलब्ध असेल. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत. ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात. (IPL 2020 Playoffs Scenario: अब आयेगा मजा! 3 प्ले ऑफ जागांसाठी 6 संघांमध्ये चुरशीची लढत, पाहा अंतिम-4ची समीकरणे)

दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 15 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी 8 विजय सनरायझर्स हैदराबादने जिंकले आहेत, तर आरसीबीने 7 सामन्यात विजय मिळवला आहे. या हंगामात खेळल्या गेलेल्या दोन्ही संघांमधील पहिल्या सामन्यात बेंगलोर संघाने हैदराबादविरुद्ध विजय मिळवला होता. आरसीबीला शेवटच्या दोन सामन्यात सलग पराभवाचा सामना करावा लागला होता. दोन्ही संघाच्या फलंदाजांनी मागील काही सामन्यात प्रभावी कामगिरीत बजावली आहे, त्यामुळे आजच्या सामन्यातही त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील. कर्णधार कोहली आणि वॉर्नरकडूनही मोठ्या डाव पाहायला मिळू शकतो.

पाहा आरसीबी आणि एसआरएच प्लेइंग इलेव्हन

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर: आरोन फिंच, देवदत्त पडिक्कल, पार्थिव पटेल, विराट कोहली (कॅप्टन), एबी डिविलियर्स, गुरकीरत सिंह, शिवम दुबे, क्रिस मॉरिस, वाशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, नवदीप सैनी, डेल स्टेन, युजवेंद्र चहल, अ‍ॅडम झांपा, ईसूरु उदाना, मोईन अली, जोश फिलिप, पवन नेगी, पवन देशपांडे, मोहम्मद सिराज, उमेश यादव.

सनरायझर्स हैदराबाद: डेविड वॉर्नर (कॅप्टन), अभिषेक शर्मा, बासिल थंपी, यरा पृथ्वीराज, बिली स्टॅनलेक, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), केन विल्यमसन, मनीष पांडे, मोहम्मद नबी, राशिद खान, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, टी नटराजन, विजय शंकर, रिद्धिमान साहा, अब्दुल समद, फॅबियन ऍलन, जेसन होल्डर, प्रियम गर्ग, संदीप बावनका, संजय यादव, विराट सिंह.