
RCB vs PBKS Live Score Updates of IPL 2025: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना सुरू झाला आहे. अवघ्या पाच षटकांत आरसीबीच्या पाच विकेट पडल्या आहेत. किंग कोहली अवघी एक धाल करून पव्हेलीयनमध्ये परतला. अर्शदीपने दोन विकेट घेतल्या आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणार प्रत्येकी 14-14 ओवर्सचा सामना खेळवण्यात येणार आहे. बेंगळुरूमध्ये सकाळपासूनच पावसाचे सावट होते. पावसामुळे तेथे आरसीबी आणि पंजाब यांच्यातील टॉसही वेळेत होऊ शकला नव्हता. इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) चा 34 वा सामना आज शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यात आयोजित करण्यात आला आहे. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. पहा सामन्याचे स्कोअरकार्ड
Who won today 🧐
RCB 34-5
Punjab kings won the match easily 💥 💯
Chinnaswamy
Yuzi Chahal 💥 #RCBvPBKS pic.twitter.com/3BD4mSxgxD— The_Hardy (@AdityaSindhi) April 18, 2025
सामन्यात पावसाने हजेरी लावल्याने क्रीकेट चाहत्यांमध्ये मोठे नाराजी आहे. बेंगळुरूमध्ये पावसामुळे टॉसही वेळेत होऊ शकला नव्हता. काहीवेळापूर्वी पाऊस थांबला. यामुळे नाणेफेक झाली आहे. पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकली. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाऊस थांबल्यानंतर एम चिन्नास्वामी स्टेडियमवर ग्राउंड स्टाफकडून मैदान खेळण्यासाठी तयार करण्यात आले. त्यामुळे उशीरा सामना सुरू झाला. गुणतालीकेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तिसऱ्या स्थानावर आहे आणि पंजाब संघ चौथ्या स्थानावर आहे. दोन्ही संघांनी 6-6 सामने खेळले आहेत आणि 4-4 असे जिंकले आहेत.