RCB vs KKR (Photo Credit - Twitter)

RCB vs KKR Weather Updates: एका आठवड्यापेक्षा जास्त काळ विश्रांती घेतल्यानंतर आयपीएल 2025 पुन्हा सुरू होत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना () शनिवार, 17 मे रोजी एम चिन्नास्वामी स्टेडियम, (M Chinnaswamy Stadium) बंगळुरू येथे खेळला जाईल. चाहते आयपीएल पुन्हा सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण पावसामुळे चाहत्यांच्या आशा धुळीस मिळण्याची शक्यता आहे. कारण, बेंगळुरूमध्ये सध्या हवामान खराब आहे आणि तिथे सतत पाऊस पडत आहे. गुरुवारीही एम चिन्नास्वामी स्टेडियमवर मुसळधार पाऊस पडला. सामन्याच्या दिवशी बेंगळुरूमधील हवामान खराब राहील असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आरसीबी विरुद्ध केकेआर सामन्यात अडथळे येऊ शकतात असा अंदाज आहे.

आरसीबी विरुद्ध केकेआर हवामान अहवाल

अ‍ॅक्युवेदरच्या मते, शनिवारी, 17 मे रोजी बेंगळुरूमध्ये पावसाची 84 टक्के शक्यता आहे. रात्री ढगाळ वातावरण असण्याची 98 टक्के शक्यता आहे. अहवालानुसार, दुपारपासून बेंगळुरूमध्ये पाऊस सुरू होईल. आरसीबी विरुद्ध केकेआर सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. 7 ते 9 वाजेपर्यंत पावसाची 40 टक्के शक्यता आहे. परंतु 10 वाजल्यापासून पावसाची शक्यता वाढेल.