रॉयल चैलेंजर्स बैंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि कोलकाता नाइट राइडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यामध्ये आज एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर (M. Chinnaswamy Stadium, Bengaluru) आयपीएल 12 मधील सतरावा सामना रंगणार आहे. टॉस जिंकत कोलकत्ता नाईट रायडर्सने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. IPL 2019 Full Schedule: 23 मार्च ते 5 मे दरम्यान रंगणार्या VIVO IPL 12 चे वेळापत्रक PDF स्वरूपात पहा आणि डाऊनलोड करा; जाणून घ्या कधी, कुठे रंगणार आयपीएलचे सामने
कुठे पहाल ऑनलाईन सामना
आयपीएल 12 व्या सीझनमध्ये हॉटस्टार आणि स्टारस्पोर्ट्स हे आयपीएलचे ब्रॉडकास्टिंग पार्टनर असल्याने तुम्हांला त्यांच्या चॅनलल्सवर सामने पाहता येतील. बेंगलोर विरुद्ध कोलकत्ताचा ऑनलाईन सामना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
.@DineshKarthik wins the toss and elects to bowl first at the Chinnaswamy 👌👌#RCBvKKR pic.twitter.com/V9LmTVAl0a
— IndianPremierLeague (@IPL) April 5, 2019
कोलकत्ता आणि बेंगलोरची तुलना केल्यास आतापर्यंतचा खेळ पाहता कोलकत्ता संघ अधिक मजबूत स्थितीमध्ये आहे. कोलकत्ता संघातील स्टार खेळाडूदेखील उत्तम स्थितीमध्ये आहेत. बेंगलोर संघाने चार सामने खेळले असले तरीही अद्याप अजूनही विजय मिळवता आला नाही. त्यामुळे आज होमपीचवर सुरू असलेल्या सामन्यात बेंगलोरकडून विजयासाठी नक्की प्रयत्न केले जातील.