RCB vs CSK, IPL 2020: आयपीएल मोसमातील एका सामन्यात विराट कोहली व आरसीबी 'ग्रीन' जर्सी का घालतात? रॉयल चॅलेंजर्सच्या 'गो ग्रीन' उपक्रमाबद्दल जाणून घ्या
विराट कोहली, देवदत्त पड्डीकल (Photo Credit: Twitter/IPL)

RCB vs CSK, IPL 2020: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (आरसीबी) आयपीएलच्या प्रत्येक हंगामात एकदा ग्रीन जर्सी घालण्याचा आपला ट्रेंड चालू ठेवला आहे. यावर्षी, त्यांनी रविवार, 25 ऑक्टोबर रोजी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध सामन्यात ग्रीन जर्सी परिधान केली. या मोसमातील 44 वा सामना दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. 2011 पासून आरसीबीच्या खेळाडू प्रत्येक हंगामात एकदा तरी ग्रीन जर्सी घालतात. मागील वर्षी, त्यांनी दिल्ली कॅपिटलविरुद्ध, तर 2018 मध्ये आरसीबीने राजस्थान रॉयल्सविरूद्ध ग्रीन जर्सी परिधान केली होती. पण आरसीबी प्रत्येक हंगामात एकदा ग्रीन जर्सी का घालतात? त्यामागचा संदेश काय आहे? आज आम्ही तुम्हाला इथे सांगणार आहोत. (RCB vs CSK, IPL 2020: विराट कोहलीची अर्धशतकी खेळी, रॉयल्स चॅलेंजर्सचे CSK समोर 146 धावांचे लक्ष्य)

'गो ग्रीन' उपक्रमाविषयी जागरूकतेसाठी आरसीबी ग्रीन जर्सी घालतात. पर्यावरण संवर्धन आणि झाडे लावण्याबाबतचा हा उपक्रम आहे. ग्लोबल वार्मिंग ही जगातील एक समस्या आहे जी येत्या काही वर्षांत परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. या उपक्रमाच्या माध्यमातून आरसीबीने पुनर्वापर करण्याबाबत जनजागृती देखील करते. प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कमी करणे, पुनर्वापर करा आणि पुन्हा वापरा करणे ही तीन महत्त्वाची पावले आहेत. हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की आरसीबीची हिरवी जर्सी पुनर्वापर केलेल्या प्लास्टिकपासून बनवण्यात आली आहे.

2016मध्ये गुजरात लायन्सविरुद्ध सामन्याआधी विराट कोहली आणि सेनेने सायकलवरून मैदान गाठले होते आणि त्या सामन्यात त्यांनी ग्रीन जर्सी परिधान केली होती. फ्रॅंचायझीने चाहत्यांसाठी सीएनजी ऑटोरिक्षांची व्यवस्था केली होती. पारंपारिकपणे, आरसीबी कर्णधार आपल्या समकक्षांना एक रोपटं देखील भेट देतात परंतु यंदा असे काही झाले नाही. दहा सामन्यांपैकी सात विजयांसह आरसीबी पॉईंट्स टेबलवर तिसर्‍या स्थानावर आहे. आणि आता त्यांना पुन्हा एकदा पहिल्या स्थानावर जाण्याची संधी असेल. सीएसकेविरुद्ध विजय आरसीबी दुसऱ्यांदा गुणतालिकेत पहिले स्थान मिळवेल. मात्र, दिवसाच्या दुसर्‍या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला तर ते तिसऱ्या स्थानावरच कायम राहतील.