RCB vs CSK, IPL 2020: विराट कोहलीची अर्धशतकी खेळी, रॉयल्स चॅलेंजर्सचे CSK समोर 146 धावांचे लक्ष्य
विराट कोहली (Photo Credit: Twitter/IPL)

RCB vs CSK, IPL 2020: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात आयपीएलचा (IPL) 44वा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. आजच्या सामन्यात टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत आरसीबीने (RCB) 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावरून विराट कोहलीच्या (Virat Kohli) 50 आणि एबी डिव्हिलिअर्सच्या (AB de Villiers) 39 धावांच्या जोरावर 145 धावांपर्यंत मजल मारली आणि सीएसकेला विजयासाठी 146 धावांचे लक्ष्य दिले. आरसीबीसाठी डिव्हिलिअर्सने सर्वाधिक धावा केल्या, विराटने धावा आणि देवदत्त पड्डीकलने 22 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांनी अखेरच्या क्षणी आरसीबी फलंदाजांना स्वस्तात बाद करून त्यांच्या धावगतीवर वेसण घातले. सॅम कुरन 3, दीपक चाहर 2 आणि मिशेल सॅटनरला 1 विकेट मिळाली. (RCB vs CSK, IPL 2020: आयपीएल मोसमातील एका सामन्यात विराट कोहली व आरसीबी 'ग्रीन' जर्सी का घालतात? रॉयल चॅलेंजर्सच्या 'गो ग्रीन' उपक्रमाबद्दल जाणून घ्या)

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केल्यावर बेंगलोरला पहिला धक्का आरोन फिंचच्या रूपात पहिला फटका बसला. फिंचला 11 चेंडूत 15 धावांवर कुरनने रुतुराज गायकवाडकडे झेलबाद केले. त्यानंतर आयपीएल 2020 मध्ये पहिला सामना खेळणाऱ्या सॅटनरने देवदत्तला कुरनकडे कॅच आऊट करून दुसरे यश मिळवून दिले. त्यांनतर चाहरने कोहली आणि डिव्हिलिअर्सची घातक जोडी फोडली. दोंघांनी 80 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. दीपकने 39 धावा करून खेळणाऱ्या डिव्हिलिअर्सला सीमारेषेवर डु प्लेसिसकडे झेलबाद करून माघारी धाडले. मोईन अली 1 धाव काढून कुरनचा शिकार बनला. यानंतर कोहलीने 42 चेंडूत हंगामातील तिसरे तर आयपीएलमधील 39वे अर्धशतक ठोकले. कुरनने 19व्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर आरसीबीकर्णधार कोहलीला अर्धशतक करताच पुढील चेंडूवर डु प्लेसिसकडे झेलबाद केले.

दुसरीकडे, आजच्या सामन्यासाठी बेंगलोरने इसरू उडानाच्याऐवजी मोईन अलीला संधी दिली आहे. तर चेन्नईने जोश हेजलवूड आणि शार्दुल ठाकूरच्याऐवजी मिशेल सॅटनर आणि मोनू सिंहचा टीममध्ये समावेश केला आहे.