
DC vs RCB, TATA IPL 2025 46th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 46 वा सामना आज म्हणजेच 27 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (DC vs RCB) यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा सहा गडी राखून पराभव केला आहे. त्याआधी, बंगळुरुने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 8 गडी गमावून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर 163 धावांचे लक्ष्य दिले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या आरसीबीने 4 गडी गमावून लक्ष्य गाठले.
Match 46. Royal Challengers Bengaluru Won by 6 Wicket(s) https://t.co/9M3N5Ws7Hm #DCvRCB #TATAIPL #IPL2025
— IndianPremierLeague (@IPL) April 27, 2025
भुवनेश्वर कुमारने घेतल्या तीन विकेट
प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने निर्धारित 20 षटकांत आठ गडी गमावून 162 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून स्टार फलंदाज केएल राहुलने 41 धावांची शानदार खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, केएल राहुलने 39 चेंडूत तीन चौकार मारले. केएल राहुल व्यतिरिक्त, धोकादायक फलंदाज ट्रिस्टन स्टब्सने 34 धावा केल्या. दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, जोश हेझलवूडने दोन विकेट घेतल्या.
विराट आणि कृणाल पांड्याने फिरवला सामना
त्यानंतर, लक्ष्याचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 18.3 षटकांत फक्त पाच विकेट गमावून लक्ष्य गाठले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून कृणाल पांड्याने 71 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीदरम्यान, त्याने 47 चेंडूत पाच चौकार आणि चार षटकार मारले. त्याच्या व्यतिरिक्त विराट कोहलीने नाबाद 51 धावांचे महत्वपुर्ण योगदान दिले. त्याच वेळी, दिल्ली कॅपिटल्सकडून कर्णधार अक्षर पटेलने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.