(Photo Credits: File Image)

टीम इंडिया (Team India) चा अष्टपैलू धुरंधर खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने काही वेळापूर्वी संजय मांजरेकर Sanjay Manjrekar) यांच्या वादग्रस्त कॉमेंट्रीवर जोरदार पलटवार केला आहे. मांजरेकर यांनी कालच्या सामन्यात जडेजाला तुकड्या तुकड्यांमध्ये खेळणारा खेळाडू असे म्हंटले होते, यावरून त्याच वेळी अनेक नेटकऱ्यांनी मांजरेकरांना निशाणा करत जडेजाची पाठराखण केली होती, मात्र आता जडेजाने स्वतःच मांजरेकर यांना जबर उत्तर देत एक ट्विट केले आहे. या ट्विटला सुद्धा नेटकऱ्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. हे एकंदरीत प्रकरण नेमकं होतं तरी काय, जाणून घ्या..

विश्वचषकातील टीम इंडिया विरुद्ध बांग्लादेश या सामन्यात कॉमेंट्री करत असताना संजय मांजरेकर यांनी कोणत्याही खेळाडूला बोचेल असे विधान केले होते, त्यांनी बोलताना " सामन्यात कधीतरीच उत्तम खेळणाऱ्यांचा मी काही मोठा चाहता नाही, जडेजा हा आता टेस्ट मॅच मध्ये खेळणारा एक चांगला खेळाडू असला तरी, वन डे क्रिकेट मध्ये मी एखादा चांगला फलंदाज व स्पीनर गोलंदाज निवडेन" असा शाब्दिक वार केला होता.(ICC World Cup 2019: रोहित शर्मा ने मारलेला षटकाराचा चेंडू 'तिला' लागला; हिटमॅन ने ऑटोग्राफ कॅप देऊन केली भरपाई, पहा Photo)

या विधानाला उत्तर देत आज जडेजा याने सुद्धा एक ट्विट केले आहे, ज्यामध्ये त्याने " मी निश्चितच तुमच्याहून दुप्पट मॅचेस खेळलो आहे आणि अजूनही खेळतो आहे, त्यामुळे निदान ज्यांनी आयुष्यात काहीतरी साध्य केलंय त्यांचा आदर करायला शिका, मी तसाही तुमच्या या व्हर्बल डायरिया ने वैतागलोच आहे" असे उत्तर दिले आहे.

IND vs BAN मॅचमध्ये एम एस धोनीवर कॉमेंट्री दरम्यान संजय मांजरेकर ने केली टीका, चाहत्यांनी सोशल मीडियावर आपल्याच अंदाजात घेतली शाळा, पहा Tweets

रवींद्र जडेजा ट्विट

नेटकऱ्यांनी मिम्स मधून केली पाठराखण

दरम्यान, संजय मांजरेकर यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याआधी सुद्धा सामन्याच्या दरम्यान मांजरेकर यांनी महेंद्रसिंग धोनी याच्यावर अपमानास्पद वक्तव्य केले होते, क्रिकेट मधील आकडेवारी पाहिल्यास रविंद्र जडेजा याने आतापर्यंत 151 वनडे मॅचेस मध्ये 2035 रन काढले आहेत तर 174 विकेट्स देखील घेतल्या आहेत. तर, दुसरीकडे संजय मांजरेकर यांनी 74 मॅचेस मध्ये 1994 रन काढून केवळ १ विकेट घेतली आहे.