(Photo Credit: Team India/Instagram)

आयसीसी (ICC) विश्वकपच्या सामन्यात टीम इंडिया (Team India) ने बांगलादेश (Bangladesh) चा पराभव केला. याच बरोबर भारतीय संघाने विश्वकपच्या सेमीफाइनलमध्ये धडक मारली आहे. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत भारतीय संघाने 314 धावांचा डोंगर अभा केला. रोहित शर्मा (Rohit Sharma) ने संघाला भक्कम पाया रचून दिल्यामुळे आणि शतकी खेळी केल्यामुळे धावसंख्येचा हा आकडा गाठता आला. रोहितने 104 धावांची केली करत टीमच्या विजयात मोलाची कामगिरी केली. रोहितने सात चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने विश्वकपमध्ये आपले चौथे शतक ठोकले. मात्र, सीमारेषेपल्याड फटका मारत षटकार करणाऱ्या रोहितने असाच एक चेंडू भिरकावला, तो षटकारासाठी गेलासुद्धा पण, प्रेक्षकांमध्ये असणाऱ्या एका टीमच्या चाहतीला तो लागला. (ICC World Cup 2019: IND vs BAN सामन्यात रोहित शर्मा याच्या शतकी खेळीनंतर युवराज सिंह याने घेतली केव्हिन पीटरसन याची फिरकी)

मीना (Meena) नावाच्या या चाहतीला चेंडू लागल्याचं रोहितला समजले आणि त्याने सामना संपल्यानंतर तिची भेट घेतली. आपण मारलेला बॉल एका चाहत्याला लागले हे समजताच रोहितने तिला सही केलेली एक टोपी भेट स्वरुपात दिली आणि तिच्याशी संवादही साधला. यावेळी तिच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याजोगा होता. कारण हा प्रसंग तिच्यासाठी अनपेक्षित होता.

 

View this post on Instagram

 

She got hit by a @rohitsharma45 maximum and the opener was kind enough to check on her and give her a signed hat. #CWC19

A post shared by Team India (@indiancricketteam) on

दरम्यान, बांगलादेश विरुद्ध शतकी खेळी करण्याआधी रोहितला तमीम इक्बाल (Tamim Iqbal) ने जीवदान दिले होते. आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये रोहितला 7 पैकी 5 सामन्यात जीवदान मिळाले आहेत. शिवाय, बांगलादेशविरुद्ध रोहितने विश्वकपमध्ये 500 धावा पूर्ण केल्या असून अशी कामगिरी करणारा तो सचिन तेंडुलकर नंतर दुसऱा भारतीय ठरला आहे.