9 वर्षांपूर्वी, 2011 मध्ये घरच्या मैदानावर खेळत भारतीय संघाने (Indian Team) दुसऱ्या वर्ल्ड कपच्या जेतेपदाचा मान मिळवला. या दिवसाची आठवण म्हणून चाहते, क्रिकेटर्स आणि अनेकांनी एकमेकांचे अभिनंदन करण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केले. विश्वचषक (World Cup) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेला (Sri Lanka) 6 विकेट आणि 10 चेंडू राखून पराभूत करत 28 वर्षात पहिल्यांदा तर एकूण दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला. सहा वर्षांनंतर भारतीय प्रशिक्षक म्हणून नियुक्त होण्यापूर्वी 2 एप्रिल रोजी त्या रात्री भाष्य करणारे रवी शास्त्री यांनी ट्विटरवरुन खेळाडूंचे अभिनंदन केले. या ट्विटमध्ये शास्त्री (Ravi Shastri) यांनी सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांनाच टॅग केले आणि विजयाचे मुख्य नायक युवराज सिंह (Yuvraj Singh) आणि एमएस धोनीकडे (MS Dhoni) दुर्लक्ष केले. यावर युवीने म्हटले "आपण मला आणि माहीला टॅग करू शकता आम्ही देखील त्याचा भाग होतो." (2011 वर्ल्ड कप फायनलमध्ये एमएस धोनीच्या विजयी षटकाराचे कौतुक केल्याने भडकला गौतम गंभीर, पाहा काय म्हणाला माजी भारतीय फलंदाज)
"अभिनंदन मित्रांनो! हे सैदव तुमच्या ध्यानात राहील. जसे आम्ही 1983 च्या ग्रुपमधील आहोत, शास्त्री यांनी ट्विटमध्ये लिहिले. युवराज आणि धोनी क्रीजवर होते जेव्हा माहीने लाँगऑनवर शानदार षटकार ठोकला आणि 28 वर्षाची विश्वचषक जिंकण्याची प्रतीक्षा संपुष्टात आणली. विश्वचषक जिंकणाऱ्या संघात सचिन-कोहलीव्यतिरिक्त आणखी बरेच जण सहभागी असल्याचे युवीने भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या विद्यमान मुख्य प्रशिक्षकाला लक्षात आणून दिले. यावर आता शास्त्री यांनी आपली चूक सुधारली आणि दुसरे ट्विट केले. शास्त्रींनीं लिहिले,"जेव्हा विश्वचषकांची चर्चा येते तेव्हा तू ज्युनिअर नाही. तुसी लीजेंड हो."
Thanks senior ! U can tag me and mahi also we were also part of it 😂
— yuvraj singh (@YUVSTRONG12) April 2, 2020
शास्त्री यांनी सुधारली चूक
When it comes to World Cups, you are no Junior. Tussi Legend Ho @YUVSTRONG12 ! 🤗 https://t.co/bnZHTyFd8x
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) April 3, 2020
संपूर्ण विश्वचषकात अष्टपैलू कामगिरीबद्दलयुवराजला सामनावीर जाहीर करण्यात आले, तर अंतिम सामन्यात धोनीला 91 धावांच्या नाबाद खेळीची सामनावीर घोषित करण्यात आले. महत्वाचे म्हणजे, शास्त्री यांनी ट्विटमध्ये गौतम गंभीरलाही टॅग केले नाही. अंतिम सामन्यात गंभीरने 97 धावांचा महत्वपूर्ण डाव खेळला आणि टीमला विजयाच्या जवळ नेले.