Ranji Trophy 2022: बरोदा (Baroda) क्रिकेटपटू विष्णू सोलंकी अशा शेकडो देशांतर्गत क्रिकेटपटूंपैकी एक आहे जो दरवर्षी रणजी करंडक (Ranji Trophy) खेळण्यासाठी मोठ्या उत्साहाने पण कमी आशेने उच्चभ्रूंचा दरवाजा तोडून खेळण्यासाठी येतो. पण गेली दोन आठवडे बडोदाच्या 29 वर्षीय खेळाडूसाठी फारच कठीण ठरले आहेत. रणजी ट्रॉफी स्पर्धा खेळत असताना विष्णू सोलंकी याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या नवजात मुलीचे निधन झाले होते आणि आता त्याच्या वडिलांचे देखील निधन झाले आहे. 10 फेब्रुवारी रोजी, विष्णूला एक मुलगी झाली. पण एक दिवसानंतर बाळाचा रुग्णालयात मृत्यू झाला आणि विष्णू, जो बायो-बबलमध्ये होता, अंत्यसंस्कारासाठी त्याच्या गावी निघून गेला. आणि बरोदा आपल्या पहिल्या सामन्यासाठी सज्ज असताना विष्णूने आपल्या नवजात मुलीचा अंतिम संस्कार केला.
यानंतर सोलंकी कटक (Cuttack) येथे बरोदा संघाच्या साम्ण्यासाठी पोहोचला. आणि आपले वैयक्तिक दुःख मागे ठेवून त्याने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अप्रतिम शतक झळकावले. भुवनेश्वरमधील एलिट ग्रुप बी (फेरी 2) च्या या सामन्यात त्याने ही अप्रतिम खेळी खेळली. तथापि हे सर्व देखील पुरेसे नसताना रविवारी रणजी सामन्याच्या शेवटच्या दिवशी, विष्णूला मॅनेजरकडून आत येण्याचा फोन आला आणि बातमी देण्यात आली की गंभीर आजाराशी लढा देत त्याच्या गावी रुग्णालयात असलेल्या त्याच्या आजारी वडिलांचे निधन झाले आहे. “विष्णूकडे आपल्या मुलीच्या मृत्यूनंतर परत न येण्याचा पर्याय होता, परंतु तो जो टीम मॅन आहे, त्याला त्याच्या टीमला सोडायचे नव्हते. त्यामुळेच तो एक खास माणूस बनतो,” BCA अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले. विष्णू सोलंकीला रणजी ट्रॉफी सामन्यात चंदीगडविरुद्ध खेळताना या घटनेची माहिती मिळाली.
पण बायो-बबल सोडण्याऐवजी, विष्णू सोलंकीने मागे राहण्याचा पर्याय निवडला आणि ड्रेसिंग रूमच्या कोपऱ्यात व्हिडिओ कॉलवर आपल्या वडिलांचे अंतिम संस्कार पाहिले. दरम्यान, पुढील रणजी ट्रॉफी सामना 3 मार्चपासून सुरु होईल जिथे बडोदा आणि हैदराबाद संघ आमनेसामने येतील. पण विष्णूला दुःख करायला थोडा वेळ मिळावा अशी इच्छा आहे. दोन आठवड्यांच्या आत मूल आणि पालक गमावणे म्हणजे काय हे समजण्यासाठी त्याला कदाचित अजून वेळ मिळाला नाही.