सौरभ तिवारी (Photo Credit: Getty Images)

रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) नवीन हंगाम परत आला असून पहिल्या फेरीत बरेच लक्षवेधी सामने पाहायला मिळाले. असाच एक सामना झारखंड (Jharkhand) आणि त्रिपुरा (Tripura) संघात झाला, जोसी गटातील सामना होता. पहिले फलंदाजी करत त्रिपुराने 289 धावा केल्या. याच्या प्रत्युत्तरात त्रिपुराच्या गोलंदाजांनी शानदार प्रदर्शन करत झारखंडला 136 धावांवर ऑल आऊट केले आणि फॉलोऑन दिला. दुसऱ्या डावातही झारखंडची स्थिती एकेवेळी खराब होती. झारखंडने दुसऱ्या डावात फलंदाजी करत 138 धावांवर 5 गडी गमावले होते आणि पराभवाच्या उंबरठ्यावर होते. गुरुवारी सामन्याच्या चौथ्या दिवशी झारखंडने रणजी ट्रॉफी गट सीच्या पहिल्या सामन्यात त्रिपुराला 54 धावांनी पराभूत करत सनसनाटी विजय मिळवला. झारखंडसाठी हा एक ऐतिहासिक विजय होता. रणजी ट्रॉफीच्या 85 वर्षांच्या समृद्ध इतिहासातील झारखंड हा एकमेव संघ बनला आहे ज्याने फॉलोऑन दिल्यावर प्रथम श्रेणी सामना जिंकला. (Ranji Trophy 2019-20: अंपायरने चुकीचं आऊट दिल्यावर चिडला युसुफ पठाण, अजिंक्य रहाणे सह मैदानातच भिडला, पाहा Video)

सामना अजूनही त्रिपुराच्या बाजूने असताना झारखंडचे फलंदाज इशांक जग्गी (Ishank Jaggi) आणि सौरभ तिवारी (Saurabh Tiwary) अर्धशतक झळकवून डावाने होणार पराभव टाळण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर जग्गी आणि सौरभने 2001 मध्ये व्हीव्हीस लक्ष्मण आणि राहुल द्रविड यांनी केलेल्या खेळीची पुनरावृत्ती केली. दोन्ही फलंदाजांनी द्विशतकी भागीदारी केली आणि अखेरीस 8 बाद 418 धावांवर डाव घोषित केला. यानंतर झारखंडच्या गोलंदाजांनी पुढारी घेतला. यात आशिष कुमार याने महत्वाची भूमिका बजावली. आशिषने घातक गोलंदाजी करत दुसर्‍या डावात त्रिपुराला 211 धावांवर ऑल आऊट केले. या विजयासह झारखंड हा सौरव गांगुली याच्या टीम इंडिया नंतर फॉलोऑन मिळवून सामना जिंकणारा पहिला संघ ठरला आहे.

अगरतलायामध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात त्रिपुराच्या संघाने पहिल्या डावात 289 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल झारखंडचा संघ पहिल्या डावात 136 धावांच करू शकला. 153 धावांनी पिछाडीवर असताना त्यांना फॉलो-ऑन खेळाव लागला. दुसर्‍या डावात झारखंडकडून सौरभ तिवारीने 122 आणि इशांक जग्गीने नाबाद 107 धावा केल्या आणि संघाचा पराभव टाळला.