
Rajasthan Royals vs Chennai Super Kings: इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) चा 11 सामना रविवारी 30 मार्च रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (Rajasthan Royals vs Chennai Super Kings) यांच्यात बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी येथे खेळवला जात आहे. या हंगामात, राजस्थानचे नेतृत्व तीन सामन्यासाठी रियान पराग करत आहे. तर, चेन्नईची कमान ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर आहे. या हंगामात, राजस्थानने दोन्ही सामने गमावले आहे. तर चेन्नईने एक सामना जिंकला आणि एक गमावला आहे. त्यामुळे दोन्ही संघासाठी आजचा सामना महत्वाचा आहे. दरम्यान, चेन्नईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या राजस्थानने चेन्नईसमोर 183 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
200 looked easy at a point - strong comeback from CSK 💪
Who's winning this? 👀 #IPL2025 live comms: https://t.co/p1an12x2v2 | #RRvCSK pic.twitter.com/SEdx00iTld
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) March 30, 2025
नितीश राणाची 81 धावांची शानदार खेळी
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या राजस्थानने 20 षटकात 10 गडी गमावून 182 धावा केल्या. राजस्थानकडून नितीश राणाने 81 धावांची शानदार खेळी केली. त्याने 36 चेंडूत 10 चौकार आणि 5 षटकार मारले. त्याच्याशिवाय रियान परागने 37 धावांचे योगदान दिले. (हे देखील वाचा: IPL 2025: माजी भारतीय खेळाडूने रोहित शर्मावर साधला निशाणा, खराब फिटनेसवर गंभीर प्रश्न केले उपस्थित)
चेन्नईकडून घातक गोलंदाजी
दुसरीकडे, खलील अहमदने चेन्नई सुपर किंग्ज संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. चेन्नई सुपर किंग्जडून खलील अहमदन आणि नूर अहमदने आणि मथीशा पाथिराणाने प्रत्येतकी 2-2 विकेट घेतल्या. दोन्ही संघांना हा सामना जिंकून स्पर्धेत दोन गुण मिळवायचे आहेत.