Ravi Ashwin (Photo Credit - Twitter)

IND vs ENG 3rd Test: भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) कसोटी क्रिकेटमध्ये 500 बळी पूर्ण केले आहेत. राजकोट येथे सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान त्याने ही मोठी कामगिरी केली आहे. आता अश्विन हा माजी भारतीय फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेनंतर (Anil Kumble) सर्वाधिक कसोटी बळी घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. निरंजन शाह क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या सलामीच्या जोडीने भारताला पूर्णपणे अडचणीत आणले होते आणि कर्णधार रोहित शर्मा विकेट्ससाठी गोलंदाजांवर आशा पल्लवित करत होता. त्याचवेळी कर्णधाराने अश्विनकडे चेंडू सोपवला आणि तो येताच जॅक क्रॉलीला (15) रजत पाटीदारने झेलबाद केले. यासह अश्विन श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरननंतर 500 कसोटी बळी घेणारा दुसरा वेगवान गोलंदाज ठरला आहे.

फिरकीपटूंकडून सर्वाधिक कसोटी बळी

    • 800: मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका)
    • 708: शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया)
    • 619: अनिल कुंबळे (भारत)
    • 517: नॅथन लिऑन (ऑस्ट्रेलिया)
    • 500: रविचंद्रन अश्विन (भारत)

हे देखील वाचा:  Anand Mahindra Gift For Naushad Khan: सरफराज खानच्या प्रभावी कसोटी पदार्पणानंतर आनंद महिंद्राने नौशाद खान यांना 'थार' भेट देण्याची केली घोषणा

भारतीयांकडून सर्वाधिक कसोटी बळी

  • 619: अनिल कुंबळे
  • 500: आर अश्विन
  • 434: कपिल देव
  • 417: हरभजन सिंग
  • 311: इशांत शर्मा