
PBKS vs GT: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 37 वा (IPL 2024) सामना पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स (PBKS vs GT) यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुल्लानपूर येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सायंकाळी 7.30 वाजता सुरू होईल. पंजाब किंग्जला मागील तीन सामन्यांत सलग पराभवाचा सामना करावा लागला आहे. पंजाबने 7 पैकी फक्त 2 सामने जिंकले आहेत, तर 5 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. ते 4 गुणांसह गुणतालिकेत 9व्या क्रमांकावर आहेत. अशा स्थितीत त्यांना विजयाचे वेध लागणार आहेत. दुसरीकडे, गुजरात टायटन्सने 7 पैकी 3 सामने जिंकले आहेत आणि 5 सामने गमावले आहेत. शुभमन गिलचा संघ 6 गुणांसह गुणतालिकेत 8व्या स्थानावर आहे.
दोन्ही संघांची हेड टू हेड आकडेवारी
पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत 4 सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत पंजाब किंग्जने 2 सामने आणि गुजरात टायटन्सने 2 सामने जिंकले आहेत. या मोसमात उभय संघांची ही दुसरी भेट आहे. पंजाब किंग्जने पहिला सामना ३ विकेटने जिंकला होता. गेल्या मोसमात दोन्ही संघांमध्ये 1 सामना झाला होता. हा सामना गुजरात टायटन्सने ६ गडी राखून जिंकला. (हे देखील वाचा: PBKS vs GT, IPL 2024 37th Match Live Streaming: आज पंजाब आणि गुजरात यांच्यांत होणार लढत, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना)
पाहा दोन्ही संघांची प्लेइंग 11
पंजाब किंग्स: प्रभसिमरन सिंग/अथर्व तायडे, रिले रुसो, सॅम कुरन (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग.
गुजरात टायटन्स: शुभमन गिल (कर्णधार), रिद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुदर्शन, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवाटिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद/ अजमातुल्ला ओमरझाई, स्पेन्सर जॉन्सन, संदीप वॉरियर.