पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) म्हणाला की, पाकिस्तान सुपर लीग (Pakistan Super League) आर्थिक संकटाशी झगडत आहे आणि काही संघ मालकांना त्यांचे संघ विकायचे आहेत. अख्तर यांनी एका दूरचित्रवाणी कार्यक्रमात दावा केला आहे की पीएसएल (PSL) पुढील 16 ते 18 महिने होण्याची शक्यता नाही. ते म्हणाले की मला माहित आहे की काही लोकांना हे ऐकायला आवडणार नाही परंतु काही संघ मालक त्यांची फ्रँचायझी विकू इच्छित आहेत. पीएसएलच्या संरक्षणासाठी मी आर्थिक आणि बिगर आर्थिक सहाय्य केल्याचा मला आनंद होईल. भारताच्या आयपीएलशी सतत तुलना करत आपली कशी लीग कशी सर्वोत्तम आहे हे सांगणाऱ्या पाकिस्तान सुपर लीगमधील अनेक संघांवर विक्रीची वेळ आली आहे. 2008 मध्ये आयपीएलची सुरुवात झाली, त्यानंतर 2015 मध्ये पाकिस्तान बोर्डाने 5 संघासोबत पीएसएलची सुरुवात केली. सध्या या लीगमध्ये 6 टीम्स खेळतात. (Coronavirus: प्रेक्षकांविना क्रिकेट खेळण्यावर शोएब अख्तर याचा विरोध, म्हणाला 'हे म्हणजे बायकोशिवाय लग्न करणं')
माजी ज्येष्ठ खेळाडू अख्तर यांनी म्हटले आहे की, "मला माहिती आहे काही लोकांना हे ऐकण्यास आवडणार नाहीत, परंतु काही मालकांना त्यांचा मताधिकार विकायचा आहे. पीएसएल जिवंत ठेवण्यासाठी आणि भरभराटीसाठी आर्थिक आणि बिगरआर्थिक मदत करण्याने मला आनंद होईल." पाकिस्तानी टीव्ही चॅनेलशी गप्पा मारताना अख्तरने पीएसएलची सध्य स्थिती सांगितली. अख्तर म्हणाला, “मी जर हिशोब केला तर अंदाजे 16-18 महिने पीएसएलचे सामने होणार नाहीत. काही लोकांना हे ऐकणं आवडणार नाही. परंतु काही संघमालक आपले संघ विकण्याचा विचार करत आहेत. मला ही लीग वाचावी तसेच सुरु रहावी म्हणून याच्या अर्थ विभागाची मदत करण्यात आनंद आहे.”
दरम्यान, पाकिस्तान बोर्डाने याने पीएसएल अखेरच्या टप्प्यात पाकिस्तानमध्ये आयोजित पाचवा हंगाम स्थगित केला होता. कोरोना व्हायरस काळात पीएसएलचे काही सामने रिकाम्या स्टेडियममध्ये आयोजित केले गेले होते, परंतु उपांत्य फेरीसह अंतिम सामन्यांपैकी काही सामने अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले.