15 ऑगस्ट रोजी, भारताच्या महान खेळाडूंपैकी एक, एमएस धोनीने (MS Dhoni) इन्स्टाग्रामवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर करणारा मोठा निर्णय चाहत्यांसोबत शेअर केला. धोनीचा प्रभाव फक्त क्रिकेट किंवा खेळपुरता मर्यादित नव्हता. त्याने आपल्या साधेपणाने आणि चारित्र्याने इतरांच्या मनांना स्पर्श केला. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही दिलखुलास पत्र लिहून माजी भारतीय कर्णधाराचे कौतुक केले. पत्रात पंतप्रधान मोदींनी धोनीच्या क्रिकेटमधील योगदानाची कबुली दिली आणि राष्ट्रीय स्तरावर त्याचा किती मोठा प्रभाव पडला यावर प्रकाश टाकला. धोनी एक क्रिकेटपटू कोणाला आवडत नाही असं कोणी नसताना, पंतप्रधान मोदींनी 39 वर्षीय धोनीचे मानवी पैलू तसेच त्याची मुलगी झिवाशी (Ziva) असलेल्या संबंधाबद्दलही त्यांचे कौतुक केले. राष्ट्रीय सेवा यापुढे नसल्यामुळे पंतप्रधान मोदींनी या आईकॉनिक क्रिकेटपटूला रांची येथे आपल्या कुटुंबासमवेत बराच वेळ घालवायला मिळाले अशी आशा व्यक्त केली. मोदी यांनी पत्रात लिहिले की, एमएस धोनीचे नाव "जगातील सर्वात मोठे फलंदाज" आणि "क्रिकेटच्या महान कर्णधारांपैकी एक म्हणून ओळखले जाईल." (MS Dhoni To Play Farewell Match? एमएस धोनीचा फेअरवेल सामना आयोजित करण्यासाठी BCCI इच्छुक, आयपीएल दरम्यान करणार माजी कर्णधाराशी चर्चा)
स्वत: धोनीने पत्राचे फोटो ट्विटरवर शेअर केला आणि लिहिले पंतप्रधानांचे आभार मानले. त्याने लिहिले, “एक कलाकार, सैनिक आणि क्रीडापटूला ज्याची तीव्र इच्छा असते ते कौतुक आहे, ही त्यांची मेहनत आणि त्यागाची सर्वांनाच जाणीव व्हावी. कौतुक आणि शुभेच्छा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार." मोदींनी धोनीला लिहिलेल्या पत्रात म्हटले की, "तुमच्यात नवीन भारताचा आत्मा प्रतिबिंबित झाला आहे, जेथे तरुणांचे नशिब त्यांच्या कुटुंबाचे नाव ठरवत नाही, परंतु ते स्वतःचे स्थान आणि नाव मिळवतात."
An Artist,Soldier and Sportsperson what they crave for is appreciation, that their hard work and sacrifice is getting noticed and appreciated by everyone.thanks PM @narendramodi for your appreciation and good wishes. pic.twitter.com/T0naCT7mO7
— Mahendra Singh Dhoni (@msdhoni) August 20, 2020
धोनीचे सैन्य दलांवर असलेले प्रेम नाकारण्याचे कोणतेही कारण नाही. 2019 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर पुन्हा एकदा आपली नम्र बाजू दाखवताना धोनीने काही काळ सैन्यात सेवा बजावली. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या पत्रात धोनीने सशस्त्र दलांवर असलेले प्रेम याबद्दलचे कौतुक केले. शांत वर्तन ठेवून धोनीने ज्याप्रकारे कार्यपद्धतीत संतुलन राखले त्याचे महत्त्वही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. रांचीसारख्या छोट्या शहरातील धोनीने देशासाठी अकल्पनीय गोष्टी कशा मिळवल्या हे देखील पत्रात ठळकपणे सांगितले.