Mehbooba Mufti. (Photo Credit: ANI | Twitter)

वर्ल्डकप 2019 ( ICC World Cup) मध्ये भारत विरूद्ध इंग्लंड सामन्यात टीम इंडियावर 31 धावांनी मात करून इंग्लंडने यंदाच्या विश्वचषकातील भारतीय क्रिकेट संघाचा विजयरथ रोखला. भारत या सामन्यापूर्वी एकही सामना हरला नव्हता त्यामुळे कालचा (30 जून) पराभव भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या जिव्हारी लागला. जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी भारताच्या पराभवाचं खापर टीम इंडियाच्या 'भगव्या जर्सी'वर फोडलं आहे. ट्विटरच्या माध्यमातून मुफ्ती यांनी या भावना व्यक्त केल्या आहेत. भारत विरूद्ध इंग्लंड सामन्यादरम्यान पहिल्यांदा टीम इंडिया नव्या 'भगव्या जर्सी' (Orange Jersey) मध्ये मैदानात उतरली होती.  रोमहर्षक सामन्यात इंग्लंड कडून टीम इंडिया पराभूत, इंग्लंडचा 31 धावांनी विजय; धोनी ची संथ खेळी

मेहबुबा मुफ्तीचं ट्विट

मेहबुबा मुफ्ती यांनी ट्विट करून भारताच्या पराभवाचं खापर टीमच्या नव्या जर्सीवर फोडलं आहे. मला अंधश्रद्धाळू समजा पण नव्या जर्सीने आपला विजयरथ रोखला. भारतीय संघाच्या भगव्या जर्सीवर अबू आझमी यांचा आक्षेप; सरकार देशाचे 'भगवाकरण' करत असल्याचा आमदार एमए खान यांचा आरोप (Video)

टीम इंडिया आणि इंग्लंड संघाच्या जर्सीचा रंग निळाच असल्याने एका संघाला जर्सीचा रंग बदलणं भाग होतं. त्यानुसार इंग्लंड यंदा यजमान असल्याने भारताने आपल्या टीमच्या जर्सीचा रंग बदलत निळा आणि भगवा केला. भगव्या रंगापूर्वी यापूर्वीच राजकारण रंगायला सुरूवात झाली होती. आता त्यामध्ये मेहबुबा मुफ्ती यांनी देखील आता उडी घेतली आहे.

इंग्लंडसाठी कालचा भारत विरूद्धचा सामना 'करो या मरो' यासाठी होता. त्यामुळे टॉस जिंकत प्रथम फलंदाजी घेत मैदानात उतरलेल्या इंग्लंडने टीम इंडियासमोर 338 चं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र त्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची दमछाक झाली.