पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board) 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या कर्णधार सरफराज अहमद (Sarfaraz Ahmed) याला नवीन केंद्रीय करारामध्ये ‘अ’श्रेणीतून ‘सी’श्रेणीत वगळण्याचा निर्णय घेतला आहे. ऑगस्टमध्ये नवीन केंद्रीय कंत्राट खेळाडूंना देण्यात येणार आहेत. तपशिलानुसार कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) क्रीडा स्पर्धा ठप्प झाल्या असूनही खेळाडूंच्या केंद्रीय रिटेनर फी किंवा मॅच फी कमी करण्याच्या विरोधात बोर्डाने निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पीसीबीने (PCB) केवळ 19 खेळाडूंना केंद्रीय कंत्राट दिले होते ज्यात त्यांनी मोहम्मद हाफिज आणि शोएब मलिक यांच्यासारख्या वरिष्ठांना वगळले होते. बोर्डाच्या धोरणात्मक निर्णयानुसार करारबद्ध खेळाडूंची संख्या 32 वरून 19 पर्यंत कमी करण्यात आली होती. त्या यादीत सरफराजला बाबर आझम आणि यासिर शाहसमवेत ए श्रेणीत ठेवले गेले होते कारण त्यावेळी तो तिन्ही फॉर्मेटमध्ये कर्णधार होता. (क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नवीन केंद्रीय कराराची केली घोषणा; मार्नस लाबूशेन In, उस्मान ख्वाजा Out, पाहा पूर्ण लिस्ट)
नोव्हेंबरमध्ये निवड समितीने केवळ यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून नाही तर सरफराजला कर्णधार म्हणूनच आणि तिन्ही फॉर्मेट्समधून खेळाडू म्हणूनही वगळले. पीटीआयमध्ये नमूद केल्यानुसार पीसीबीच्या एका सूत्राने सांगितले की, “सध्या नवीन कंत्राटांमध्ये सरफराजला सीश्रेणीत स्थान देण्यात आले आहे.” दरम्यान, सूत्रांनी सांगितले की अबीद अलीला ब वर्गात पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे, तर त्याचे सहकारी कसोटी सलामी फलंदाज शान मसूद आणि हसन अली करार गमावू शकतात.
पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान, डायरेक्टर आंतरराष्ट्रीय क्रिकेट ऑपरेशन्स झाकीर खान आणि मुख्य प्रशिक्षक व मुख्य निवडक मिसबाह-उल-हक यांचा समावेश असलेल्या समितीमार्फत करार केलेल्या खेळाडूंची नवीन यादी निश्चित केली जात आहे. मागील केंद्रीय करारामध्ये बोर्डाने कायमस्वरुपी धारकांची संख्या 25 ते 40 टक्क्यांनी वाढविली होती आणि कोरोना व्हायरस व जगात सर्वत्र लॉकडाऊन असूनही पीसीबी समिती टेस्ट सामन्यावरील शुल्क वाढविण्याबाबत विचार करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. सध्या मध्यवर्ती करार असलेल्या खेळाडूंमध्ये हे समाविष्ट आहे:
अ श्रेणी: बाबर आझम, सरफराज अहमद आणि यासीर शाह.
बी श्रेणी: अजहर अली, हारिस सोहेल, इमाम-उल-हक, असद शफीक, मोहम्मद अब्बास, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी आणि वहाब रियाज.
सी श्रेणी: शान मसूद, फखर जमान, मोहम्मद आमिर, आबिद अली, मोहम्मद रिजवान, हसन अली, उस्मान शिनारी आणि इमाद वसीम.