![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2024/10/pakistan-vs-england-4-.jpg?width=380&height=214)
Pakistan National Cricket Team vs England National Cricket Team 2nd Test 2024 Day 3 Scorecard: पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना 15 ऑक्टोबरपासून खेळवला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुलतान क्रिकेट स्टेडियमवर(Multan Cricket Stadium) खेळला जात आहे. पाकिस्तानची (Pakistan) कमान शान मसूदच्या खांद्यावर आहे. तर इंग्लंडचे (England) नेतृत्व बेन स्टोक्स करत आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात 53 षटकांत सहा गडी गमावून 239 धावा केल्या होत्या. (हेही वाचा: Rishabh Pant Injured: टीम इंडियाला मोठा धक्का! जडेजाच्या बॉलवर ऋषभ पंत जखमी; गुडघ्याला दुखापत झाल्याने मैदान सोडावे लागले)
तिसऱ्या दिवसाचे स्कोअरकार्ड येथे पहा
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडच्या संघाने दुसऱ्या डावात 11 षटकांत दोन गडी गमावून 36 धावा केल्या होत्या. इंग्लंडचा संघ विजयापासून अवघ्या 261 धावा दूर आहे. तर पाकिस्तानला मालिकेत बरोबरी साधण्यासाठी आठ विकेट्सची गरज आहे. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात चांगली झाली नाही. अवघ्या 11 धावांवर संघाचे दोन्ही सलामीवीर पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर ओली पोप आणि जो रूट यांनी मिळून डाव सांभाळला. ऑली पोप नाबाद 21 आणि जो रूट नाबाद 12 धावांसह खेळत आहेत. पाकिस्तानकडून साजिद खान आणि नोमान अली यांनी प्रत्येकी एक विकेट घेतले.
नाणेफेक जिंकून फलंदाजीला आलेल्या पाकिस्तान संघाची सुरुवात निराशाजनक झाली. अवघ्या 19 धावांवर संघाला दोन मोठे धक्के बसले. यानंतर पहिली कसोटी खेळणाऱ्या सैम अयुब आणि कामरान गुलाम यांनी मिळून डाव सांभाळला. पहिल्या डावात पाकिस्तानचा संपूर्ण संघ 123.3 षटकात 366 धावा करत सर्वबाद झाला होता. पाकिस्तानकडून पदार्पण करणाऱ्या कामरान गुलामने शानदार शतकी खेळी खेळली. या खेळीदरम्यान कामरान गुलामने 224 चेंडूंत 11 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 118 धावा केल्या. कामरान गुलामशिवाय सलामीवीर सैम अयुबने 77 धावा केल्या.
अब्दुल्ला शफीकने 7 धावा, शान मसूद 3 धावा, सौद शकीलने 4 धावा, मोहम्मद रिजवान 41 धावा, आगा सलमान 31 धावा, आमेर जमाल 37 धावा, साजिद खान 2 धावा, नोमान अली 32 धावा आणि जाहिद महमूद नाबाद 2 धावा केल्या. इंग्लंडकडून जॅक लीचने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. जॅक लीचशिवाय ब्रेडेन कार्सने तीन बळी घेतले. तर मॅथ्यू पॉट्सने दोन आणि शोएब बशीरने एक विकेट घेतली.
प्रत्युत्तरात पहिल्या डावात इंग्लंडचा संपूर्ण संघ 67.2 षटकांत 6 गडी गमावून 291 धावांवर गारद झाला. पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात चांगली झाली आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी रचली. इंग्लंडकडून बेन डकेटने सर्वाधिक 114 धावा केल्या. बेन डकेटशिवाय जो रूटने 34 धावा केल्या. पाकिस्तानकडून साजिद खानने सर्वाधिक सात विकेट घेतल्या. साजिद खानशिवाय नोमान अलीने तीन बळी घेतले.
दुसऱ्या डावात 75 धावांची आघाडी घेऊन फलंदाजीला आलेल्या पाकिस्तान संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 77 धावा करून संघाचे चार फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. दुसऱ्या डावात पाकिस्तानचा संपूर्ण संघ 59.2 षटकात 221 धावा करत सर्वबाद झाला. यानंतर पाकिस्तानने इंग्लंडसमोर 297 धावांचे लक्ष्य ठेवले. पाकिस्तानसाठी आगा सलमानने दुसऱ्या डावात ६३ धावांची शानदार खेळी केली. आगा सलमानशिवाय सौद शकीलने 31 धावा केल्या. इंग्लंडकडून शोएब बशीरने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. शोएब बशीरशिवाय जॅक लीचने तीन बळी घेतले.